शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पाणी येत नाही; पण बिल भरमसाठ

By admin | Updated: January 31, 2015 23:26 IST

येथे जीवन प्राधिकरण अंतर्गत पाणी पुरवठा केला जातो. मात्र अनेकदा ग्राहकांना अतिरीक्त देयक दिले जात असल्याने याबाबत असंतोष व्यक्त केला जात आहे. यासंर्भात संबंधितांकडे तक्रार

वायगाव(नि.) येथे जीवन प्राधिकरण अंतर्गत पाणी पुरवठा केला जातो. मात्र अनेकदा ग्राहकांना अतिरीक्त देयक दिले जात असल्याने याबाबत असंतोष व्यक्त केला जात आहे. यासंर्भात संबंधितांकडे तक्रार करूनही कार्यवाही केली नसल्याने ग्राहकांवर अतिरीक्त देयकाचा बोजा पडत आहे.वायगाव येथील वॉर्ड क्रमांक २ येथील रहिवासी बापुराव वरवटकर यांच्यावर असाच अतिरीक्त देयकाचा बोजा पडला आहे. येथील अनेक नागरिकांना अत्यल्प पाणीपुरवठा होतो. घरातील नळाला पाणी येत नसल्याने नळ कनेक्शन बंद करण्यासाठी वारंवार अर्ज केला. मात्र नळ अद्याप कनेक्शन बंद करण्यात आले नाही. ग्रामपंचायत प्रशासनाने नळयोजना प्राधीकरणला हस्तांतरित केली आहे. नळाद्वारे पाणी येत नसतानाही त्यांना अकरा ते बारा हजार रूपये देयक आकारण्यात आले. यामुळे वरवटकर यांनी उपविभागीय अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण वर्धा यांच्याकडे तक्रार दिली. नळाला पुरेसे पाणी येत पंप नसल्याने गावातील नागरिकांनी पंप लावले आहे. मात्र ज्या ग्राहकांकडे पंप नाही त्यांना पाणीच मिळत नाही. वरवटकर यांच्या घरच्या नळाद्वारे पाणी येत नसतानाही त्यांना हजारो रूपयांचे देयक देण्यात आले आहे. यावरून सदर विभागाचा गलथान कारभार दिसून येतो. कार्यालयात याबाबत तक्रार केली असून कार्यवाहीकडे लक्ष लागले आहे.(वार्ताहर)