कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 06:00 AM2020-01-17T06:00:00+5:302020-01-17T06:00:17+5:30

निलेश चौधरी (३५) व राजू नामक युवक दोघेही रा. कान्हापूर (लाल बंगला) असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे. बुट्टीबोरी-तुळजापूर महामार्गाचे सिमेंटीकरण व चौपदरीकरणाचे काम पुर्णत्वास गेल्याने या मार्गावरुन धावणाऱ्या वाहनांची गती चांगलीच वाढली आहे. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास एम.एच.४६ व्ही. २००५ क्रमांकाची कार नागपूूरकडून वर्धेकडे जात होती.

Two-wheeler injured in car crash | कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

Next
ठळक मुद्देपवनार येथील घटना : कारचालक पसार

लोकमत न्यूज नेटवर्क
पवनार : भरधाव कारला अचानक दुचाकीस्वार आडवे आल्याने कारची जबर धडक बसली. यामध्ये दुचाकीस्वार दोघेही जखमी झाले असून त्यांना सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा अपघात गुरुवारी सायंकाळच्या सुमारास पवनार येथील बसस्थानकासमोर झाला.
निलेश चौधरी (३५) व राजू नामक युवक दोघेही रा. कान्हापूर (लाल बंगला) असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे. बुट्टीबोरी-तुळजापूर महामार्गाचे सिमेंटीकरण व चौपदरीकरणाचे काम पुर्णत्वास गेल्याने या मार्गावरुन धावणाऱ्या वाहनांची गती चांगलीच वाढली आहे. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास एम.एच.४६ व्ही. २००५ क्रमांकाची कार नागपूूरकडून वर्धेकडे जात होती. यादरम्यान पवनार येथील वळणमार्गावर एम.एच. ३२ व्ही.९४५४ क्रमांकाच्या दुचाकीस्वारांनी दुचाकी आडवी आणल्यानेच हा अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शीकडून सांगण्यात आले. नागरिकांनी या अपघाताची माहिती सेवाग्राम पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन गावकºयाच्या सहकार्याने दोन्ही जखमी युवकांना तत्काळ सेवाग्राम रुग्णालयात दाखल केले.
या अपघात कारसह दुचाकीचे मोठे नुकसान झाले असून अपघातानंतर कार चालकाने घटनास्थळावरुन पळ काढला. या अपघातामुळे दुचाकीच व कार रस्त्याच्या आजुबाजुला पडल्याने काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता. पोलिसांनी या मार्गावरील वाहतूक सुरळीत केली.

Web Title: Two-wheeler injured in car crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात