शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्याकडून दोन लाखांची अफरातफर

By admin | Updated: October 9, 2016 00:32 IST

एटीएममध्ये पैसे भरण्याची जबादारी असलेल्या एका कंपनीच्या कर्मचाऱ्याने दिलेली पूर्ण रक्कम एटीएम मशीनमध्ये न भरता..

कंपनीशी विश्वासघात : एटीएममध्ये भरावयाच्या पैशात घोळ वर्धा : एटीएममध्ये पैसे भरण्याची जबादारी असलेल्या एका कंपनीच्या कर्मचाऱ्याने दिलेली पूर्ण रक्कम एटीएम मशीनमध्ये न भरता त्यातील दोन लाख रुपयांची अफरातफर केल्याचा प्रकार शुक्रवारी उघड झाला. याप्रकरणी सदर कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या सहकारी कर्मचाऱ्याने केलेल्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय शालीकराम पाली (३१) रा. कुंजीलाल पेठ भगवान नगर, अजनी, नागपूर हे सीएमएस कंपनीत कार्यरत असून ही कंपनी बँकेची रक्कम एटीएम मशीनमध्ये भरण्याचे काम करते. याच कंपनीत नरेश वासुदेव चौधरी रा. बोरगाव (मेघे) हा सुद्धा काम करीत होता. त्याला एटीएम मशीनमध्ये भरण्याकरिता पैसे दिले असता त्याने पूर्ण रक्कम एटीएममध्ये न भरता १ लाख ९१ हजार ६०० रुपये स्वत:कडे ठेवून घेतले. ही बाब कंपनीच्या लक्षात येताच त्यांनी या प्रकरणी वर्धा यहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केला. विजय पाली यांनी दिलेल्या तक्रारीवरून नरेश चौधरी याच्यावर भांदविच्या कलम ४२०, ४०६, ४०८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. (प्रतिनिधी)