शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी अपघातात दोन ठार, एक गंभीर

By admin | Updated: September 8, 2015 04:11 IST

वर्धा मार्गावरील दहेगाव (गावंडे) शिवारात दुचाकींत जबर धडक झाली. यात दोघांचा मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी

नाचणगाव : वर्धा मार्गावरील दहेगाव (गावंडे) शिवारात दुचाकींत जबर धडक झाली. यात दोघांचा मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास घडली. दोन मृतकांपैकी एकाची ओळख पटली असून दुसऱ्याची ओळख अद्याप पटली नाही. मनोज चंदनखेडे (३०) रा. चितोडा असे एका मृतकाचे नाव आहे. तर दुसऱ्याची अद्याप ओळख पटली नाही. दुसऱ्या मृतकाच्या हातावर गजानन नावासह इंग्रजीत जीएम असेही गोंदले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. यातील जखमीचे नाव दीपक व्यकंट हर्षे (३२) असे असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलीस सुत्रानुसार, अमरावती येथून मनोज चंदनखेडे व दीपक हर्षे हे दोन युवक नव्या कोऱ्या दुचाकीने येत होते. दरम्यान त्यांच्या दुचाकीची दुसऱ्या दुचाकीशी जबर धडक झाली. यात दुचाकीस्वार मनोज चंदनखेडे याचा मृत्यू झाला. तर चालक दीपक हर्षे जखमी झाला. दुसऱ्या वाहनावरील एक व्यक्ती जागीच ठार झाला. तर चालक वाहन घेवून पसार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनेची माहिती मिळताच देवळी पोलीस ठाण्याचे सहायक उपनिरीक्षक संजय कापसे यांनी घटनास्थळ गाठत पंचनाम करून दोन्ही मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेतनासाठी पाठविले. प्रकरण पुलगाव ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने ते त्यांच्या स्वाधीन करण्यात आले. प्रकरणाचा तपास पुलगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र शिरतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपनिरीक्षक विठ्ठल दुधकोहळे तसेच राजू कुरसंगे करीत असल्याची माहिती आहे.(वार्ताहर)मृतदेह रुग्णालयात४अद्याप अनोळखी असलेला मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. त्याच्या हातावर गजानन व जीएम असे गोंदलेले असल्याचे पोलिसांनी सांगितले.