शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

परिवहनच्या यंत्रालाच पासच्या कार्डची ‘अ‍ॅलर्जी’

By admin | Updated: August 22, 2014 00:02 IST

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाद्वारे विद्यार्थी तसेच नोकरदार वर्गाला पासेस देण्यात आल्या आहेत़ पूर्वी कागदी पासेस दिल्या जात होत्या; पण आता प्लास्टीक कार्ड दिले जाते़ यावरील ‘कोड नंबर’

वर्धा : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाद्वारे विद्यार्थी तसेच नोकरदार वर्गाला पासेस देण्यात आल्या आहेत़ पूर्वी कागदी पासेस दिल्या जात होत्या; पण आता प्लास्टीक कार्ड दिले जाते़ यावरील ‘कोड नंबर’ मशीनमध्ये ‘मॅच’ करून पाहिला जातो; पण हे कार्ड सध्या पासधारकांसाठी डोकेदुखी ठरत आहे़ परिवहनच्या यंत्रांना या कार्डचीच ‘अ‍ॅलर्जी’ झाल्याचे दिसून येत आहे़परिवहन महामंडळाने ‘एक पाऊल प्रगतिकडे’ म्हणत पासधारक प्रवाशांना स्मार्ट कार्ड बनवून दिले़ या स्माट कार्डमध्ये विशिष्ट प्रकारचा कोड नंबर टाकण्यात आलेला आहे़ तत्सम क्रमांक परिवहनकडे नमूद केलेले असतात़ हे स्मार्ट कार्ड बसच्या वाहकाकडे असलेल्या तिकीट देण्याच्या मशीनमध्ये ‘क्रॅश’ केले जाते़ यात सदर कोड नंबर मॅच झाला तर संबधित प्रवाशाची पास ग्राह्य धरली जाते, अन्यथा त्याला तिकीट घेऊन प्रवास करावा लागतो़ सध्या प्रत्येक पासधारक विद्यार्थी, नोकरदार यांच्याकडे असे स्मार्ट कार्ड आढळून येते़ वर्धा ते खरांगणा (मो़) या मार्गावर प्रवास करणाऱ्या एका प्रवाशास या स्मार्ट कार्डचा वेगळाच अनुभव आला़ बुधवारी रात्री एका बसमध्ये बसल्यानंतर त्यांचे स्मार्ट कार्ड एक्सेस होत नव्हते़ वाहकाने प्रयत्न करूनही कार्ड एक्सेस न झाल्याने सदर प्रवाशाला तिकीट काढून प्रवास करावा लागला़ यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा त्याच समस्येचा सामना करावा लागला़ यामुळे संबधित प्रवाशाने जवळच्या गावाचे तिकीट घेत ती बस सोडली़ यानंतर दुसऱ्या बसमध्ये सदर प्रवासी बसले असता त्या बसमधील वाहकाच्या मशीनमध्ये सदर कार्ड एक्सेस झाले आणि त्यांना तिकीट काढण्याची गरज भासली नाही़ या प्रकारामुळे वाहकांसह सदर प्रवासीही चकित झाला़ एका बसच्या वाहकाकडे असलेल्या मशीनमध्ये एक्सेस होणारे कार्ड दुसऱ्या दोन बसेसमधील मशीनमध्ये एक्सेस का झाले नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़ यात स्मार्ट कार्डमध्ये काही त्रूटी आहे की परिवहनच्या मशीनमध्ये, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे़ परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत चौकशी करावी व प्रवाशांना होणारा त्रास दूर करावा, अशी मागणी होत आहे़ (कार्यालय प्रतिनिधी)