शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
3
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
4
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
5
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
6
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
7
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
8
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
9
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
10
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
11
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
12
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
13
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
14
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
15
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
16
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
17
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
18
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
19
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षा यंत्रणा दक्ष असताना तीन ठिकाणी घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 05:00 IST

स्थानिक वॉर्ड ४ मधील रितेश चंदनखेडे हे घराला कुलूप लावून कुटुंबासह शेगावला गेले होते. कुलूपबंद घर आणि परिसरात कुणी नसल्याची संधी साधून चंदनखेडे यांच्या घराच्या दाराचे कुलूप तोडून घरातील ५ ग्रॅम सोन्याचे लॉकेट किंमत २० हजार रुपये तसेच रोख रोख ८०० रुपये चोरून नेले. तर चोरट्याने रितेशच्या घराच्या शेजारी राहणाऱ्या सुरेश चंदनखेडे यांच्या घरातून मोबाईल व रोख नऊ हजार ४०० रुपये पळविले.

ठळक मुद्देआंजी (मोठी) येथील घटना : पोलिसांच्या कार्यप्रणालीवर उपस्थित केले जात आहेत प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्कआंजी (मोठी) : एका महत्त्वपूर्ण विषयावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जाहीर होणार असल्याने शनिवारी जिल्ह्यातील संपूर्ण सुरक्षा यंत्रणा दक्ष होती. असे असतानाही शनिवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी आंजी (मोठी) येथील तीन घरांना टार्गेट करून सदर घरांमधुन मुद्देमाल लंपास केला. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस असली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.स्थानिक वॉर्ड ४ मधील रितेश चंदनखेडे हे घराला कुलूप लावून कुटुंबासह शेगावला गेले होते. कुलूपबंद घर आणि परिसरात कुणी नसल्याची संधी साधून चंदनखेडे यांच्या घराच्या दाराचे कुलूप तोडून घरातील ५ ग्रॅम सोन्याचे लॉकेट किंमत २० हजार रुपये तसेच रोख रोख ८०० रुपये चोरून नेले. तर चोरट्याने रितेशच्या घराच्या शेजारी राहणाऱ्या सुरेश चंदनखेडे यांच्या घरातून मोबाईल व रोख नऊ हजार ४०० रुपये पळविले. घटनेच्यावेळी सुरेश चंदनखेडे हे आणि त्यांचे कुटुंबीय घरात झोपून होते. तसेच चोरट्यांनी सुनील विपूलवार यांच्या घराचे दार आतून बंद असताना मोठ्या चतुराईने ते उघडले. शिवाय सुनील विपूलवार यांच्याकडे दिवाळी निमित्त आलेल्या सुनीलच्या बहिनीचा मोबाईल व बॅग मधील २ हजार रुपये रोख चोरून नेली. सकाळी या तिन्ही घटना उघडकीस येताच चांगलीच खळबळ उडाली होती. गावात तीन घरी चोरी झाल्याची वार्ता परिसरात वाºयासारखी पसरल्याने घटनास्थळी बर्घ्यांची एकच गर्दी झाली होती. माहिती मिळताच खरांगणा पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या घटनेची तक्रार खरांगणा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून पुढील तपास खरांगणा (मो.) चे ठाणेदार गायकवाड यांच्या मार्गदर्शनात आंजी पोलीस चौकीचे कामडी, गायकी, चंदनखेडे, मसराम, बमनोटे करीत आहेत.आंजीवासीय आठवड्याभरात दुसऱ्यांदा टार्गेटयापूर्वी आंजी येथील तीन घरांना टार्गेट करून एका घरातून मुद्देमाल लंपास केला. त्या घटनांची नोंदही पोलिसांनी घेतली आहे. सदर घटना ताजी असतानाच आठवड्या भऱ्याच्या कालावधीतच चोरट्यांनी पुन्हा आंजी (मोठी) येथील तीन घरांवर लक्ष केंद्रीत करून मुद्देमाल पळविला. यामुळे पोलीस अधिकाºयांसह कर्मचाºयांच्या कार्यप्रणालीवर नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहे.

टॅग्स :Thiefचोर