शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी तत्काळ उपाययोजना करा

By admin | Updated: August 28, 2015 02:07 IST

शहरातील वाहतूक सुरळीत करून आवश्यक त्या ठिकाणी रस्ता विभाजक तसेच आर्वी नाका चौक व बजाज चौकामध्ये ....

वर्धा : शहरातील वाहतूक सुरळीत करून आवश्यक त्या ठिकाणी रस्ता विभाजक तसेच आर्वी नाका चौक व बजाज चौकामध्ये वाहतूक नियंत्रणासाठी आवश्यक सुधारणा करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी गुरुवारी दिल्यात. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समितीची बैठक जिल्हाधिकारी सलिल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चौधरी, समितीचे अशासकीय सदस्य प्रदीप बजाज, अनिल जगताप, नगर रचनाकार एस. व्ही. देशमुख, वाहतूक शाखेचे निरीक्षक चंद्रशेखर बहादुरे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी एच.डी. टाकरखेडे, मेघना वासनकर, विजय देशमुख, ए.आर. खोपडे, वर्धेच्या मुख्याधिकारी अश्विनी वाघमडे, उपमुख्य कार्यपालन अधिकारी सुनील मेसरे उपस्थित होते.वर्धेच्या वाहतुकीला येणाऱ्या अडथळ्यासंदर्भात नगरपरिषद सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलीस विभागातर्फे संयुक्त पाहणी करून आवश्यक त्याठिकाणी गतीरोधक लावण्यासोबतच फूटपाथची अपूर्ण कामेही तत्काळ पूर्ण करण्याच्या सूचना करण्यात आल्या. शिवाजी चौक, आर्वी नाका येथील रस्त्याच्यामध्ये येणाऱ्या विद्युत पुरवठा करणाऱ्या ट्रान्सफॉर्मर तत्काळ स्थलांतरित करण्याची कार्यवाही करावी. बजाज चौकाजवळ असलेल्या भाजी मार्केटमुळे रस्त्यावर अपघात होतात. त्यामुळे रस्त्यावर उभ्या असणाऱ्या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करणे, आर्वी चौक व बजाज चौकात वाहतूक नियंत्रणाच्या दृष्टीने आयलँड विकसीत करणे, रस्ता दुभाजकासंबधीही बैठकीत निर्देश देण्यात आले.सेवाग्राम रेल्वे स्थानकावर रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात गाड्यांची आवक असते. प्रवाशांच्या सुविधेसाठी प्रीपेड आॅटो बुथ बसविण्या संदर्भातही समितीने निर्णय घेऊन नागपूर विभागीय नियंत्रकांकडून जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भातही तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना करण्यात आल्या. रस्त्यावर होणाऱ्या अपघातासंदर्भात नागरिकांच्या माहितीसाठी मार्गदर्शक बोर्ड लावले. हेल्मेटचा वापर करणे, वाहन चालकांना सिटबेल्ट वापरणे आदी संदर्भात जागृती मोहीम राबविण्यासंदर्भातही बैठकीत चर्चा करण्यात आली. .प्रारंभी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार यांनी जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा संदर्भातील समितीच्या मागील बैठकीत झालेल्या निर्णया संदर्भात केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी जिल्ह्यातील वाहतूक नियंत्रणासह अपघात प्रवणक्षेत्रात पोलीस विभागातर्फे सुरू करण्यात आलेल्या विशेष उपक्रमाची माहिती दिली.(प्रतिनिधी)