शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

पावसाच्या लपंडावामुळे लागला ‘स्वच्छ धाम’ उपक्रमाला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 05:00 IST

पावसाळ्याला सुरुवात होण्यापूर्वी येळाकेळी शिवारात या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. पण सुमारे १८ हजार घनमीटर गाळ काढल्यानंतर पावसाला सुरुवात झाल्याने तसेच अजूनही थांबून थांबून पाऊस सुरू असल्याने ‘स्वच्छ धाम’ या  उपक्रमाला सध्या ब्रेक लागला आहे. पावसाने विश्रांती घेतल्यावर पुन्हा एकदा नव्या जोमाने गाळ काढण्याचे काम सुरू करण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे.

ठळक मुद्देपावसाळ्यापूर्वी येळाकेळी शिवारातून काढला तब्बल १८ हजार घनमीटर गाळ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या वर्धा शहरासह परिसरातील तब्बल २० गावांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविणाऱ्या धाम नदीच्या पुनर्जीवन अंतर्गत येळाकेळी येथील पिकअप वेअरपासून ते काचनूर या सुमारे २६ किमीच्या धाम नदीतून वनस्पतीसह गाळ काढण्याचे काम जानकीदेवी बजाज ग्राम विकास संस्थेच्या सहकार्याने जिल्हा प्रशासनाने हाती घेतले आहे.पावसाळ्याला सुरुवात होण्यापूर्वी येळाकेळी शिवारात या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. पण सुमारे १८ हजार घनमीटर गाळ काढल्यानंतर पावसाला सुरुवात झाल्याने तसेच अजूनही थांबून थांबून पाऊस सुरू असल्याने ‘स्वच्छ धाम’ या  उपक्रमाला सध्या ब्रेक लागला आहे. पावसाने विश्रांती घेतल्यावर पुन्हा एकदा नव्या जोमाने गाळ काढण्याचे काम सुरू करण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे.

जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेचे सहकार्य मोलाचे- धाम नदी गाळमुक्त व्हावी यासाठी जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेने मोलाचे सहकार्यच जिल्हा प्रशासनाला केले आहे. या संस्थेने आपल्या सीएसआर निधीतून  सुमारे चार लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. परंतु, थांबून थांबून होणाऱ्या पावसामुळे प्रत्यक्ष कामाला ब्रेक लागला आहे.

येळाकेळीचा बंधारा झाला गाळमुक्त- पावसाळ्यापूर्वी येळाकेळी येथील धाम नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात गाळ काढण्यात आला. त्यामुळे सध्या येळाकेळी येथील धाम नदीवरील बंधारा गाळमुक्त झाला आहे. येळाकेळीच्या धाम नदीपात्रातून काढण्यात आलेला गाळ काही शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात टाकल्याचेही सांगण्यात आले.पाटबंधारे विभागाने मिळवून दिली एनओसी - धाम नदीपात्रातील गाळ वेळीच निघावा या हेतूने प्रत्यक्ष काम होत असल्याचे लक्षात येताच वर्धा पाटबंधारे विभागाने शासनाच्या विविध विभागांकडे पाठपुरावा करून त्या त्या विभागाची एनओसी मिळवून दिली आहे. एकूणच वर्धा पाटबंधारे विभागाच्या सहकार्यानेच धाम स्वच्छ होत आहे.

 

टॅग्स :Rainपाऊसriverनदी