शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकाविनाच निघाली विद्यार्थ्यांची सहल

By admin | Updated: February 11, 2015 01:49 IST

काकडधरा जि.प. प्राथमिक शाळेची इयत्ता पहिली ते चौथीच्या सुमारे २५ विद्यार्थ्यांची रविवारी सहल आयोजित करण्यात आली़ यात एका आॅटोमध्ये

तळेगाव (श्या़पं़) : काकडधरा जि.प. प्राथमिक शाळेची इयत्ता पहिली ते चौथीच्या सुमारे २५ विद्यार्थ्यांची रविवारी सहल आयोजित करण्यात आली़ यात एका आॅटोमध्ये (मॅजिकव्हॅन) विद्यार्थ्यांना बसविण्यात येऊन त्यांना रवाना केले गेले़ स्वत: शिक्षक मात्र अन्य शिक्षकांच्या कारद्वारे सहलस्थळी पोहोचले़ शिक्षकांच्या सहलीचा हा प्रकार पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या़काकडधरा येथील जि़प़ शाळेच्या शिक्षकांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीने सहलीचे आयोजन केले़ रविवार शाळेच्या सहलीचे आयोजन करण्यात आले. तळेगाव ते सिंभोरा-मोर्शी मार्गे पिंगळादेवी तेथून मोझरीला परत, असा १४० किमीचा प्रवास या विद्यार्थ्यांना शिक्षकाविना करावा लागला़ गाडीची आसन क्षमता आठ ते नऊ प्रवासी असताना यात चक्क २२ ते २५ विद्यार्थ्यांना प्रत्येकी १०० रुपये घेऊन कोंबण्यात आले. स्वत: शिक्षकांनी मात्र आरामात दुसऱ्या वाहनात बसून सहलीचा आनंद लुटला़ नियमाप्रमाणे शासकीय वाहनातूनच सहल घेऊन जावे लागते़ शिवाय विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक आहे़ तशा सूचनाही शिक्षण विभागाने यापूर्वी दिलेल्या आहेत़ असे असताना सर्व नियम डावलून अशा सहलीचे आयोजन करणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न पालकांद्वारे उपस्थित केला जात आहे़ मार्गातच एखादे संकट उभे ठाकल्यास जबाबदार कोण, चिमुकल्यांनी काय करावे, आदी प्रश्नही उपस्थित केले जात आहे़ याबाबत विभागातील वरिष्ठांकडे तक्रार करून चौकशीची मागणी करण्यात आली आहे़ याबाबत गट शिक्षण अधिकारी आऱ एच़ खान यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही़(वार्ताहर)