शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी बांधवांचा धडक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 01:06 IST

आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी जागतिक मूलनिवासी गौरव दिन उत्सव समितीच्या नेतृत्वात आदिवासी बांधव बुधवारी मोर्चाच्या स्वरुपात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले.

ठळक मुद्देमागण्यांची पूर्तता करा : जिल्हाधिकाºयांमार्फत राज्यपालांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी जागतिक मूलनिवासी गौरव दिन उत्सव समितीच्या नेतृत्वात आदिवासी बांधव बुधवारी मोर्चाच्या स्वरुपात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. यावेळी हजारो आदिवासी बांधव मोर्चात सहभागी झाले होते.सदर मोर्चासाठी जिल्हाभरातील आदिवासी बांधव येथील जिल्हा कारागृहातील शहीद भूमीजवळ एकत्रित आले. त्यानंतर हा मोर्चा गांधी चौक, जयंत टॉकीज चौक, प्रियदर्शिनी चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. गोंडवाना विदर्भ राज्य निर्माण करण्यात यावे, कोलमाईन्समध्ये गेलेल्या आदिवासींच्या जमिनी व इतर लोकांच्या जमिनी संबंधित शेतकºयास परत देण्यात याव्या, जल, जंगल, जमिनीवर स्थायी आदिवासी लोकांच्या अधिकार देण्यात यावे, आदिवासी जमीन विक्रीचा कायदा कडक करण्यात यावा, जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात स्वतंत्र वसतिगृहाची निर्मिती करावी, जिल्ह्याच्या ठिकाणी स्वतंत्र आदिवासी सांस्कृतिक सभागृह विभागामार्फत बांधण्यात यावे, ६ जुलै २०१७ च्या सुप्रिम कोर्टाच्या आदेशाची विनाविलंब अंमलबजावणी करावी, १५ जून १९९५ व २१ आॅक्टोबर २०१५ हे शासन निर्णय परिपत्रक तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात यावे, पेसा कायद्याची अंमलबजावणी प्रभावाने करावी, आदी मागण्या यावेळी लावून धरण्यात आल्या.त्यानंतर एका शिष्टमंडळाद्वारे जिल्हाधिकाºयांमार्फत महामहीम राज्यपालांना निवेदन पाठविण्यात आले, अशी माहिती प्रा. धीरज शेडमाके, मनोज आत्राम यांनी दिली. मोर्चात आदिवासींच्या विविध संघटना सहभागी झाल्या होत्या.सांकेतिक मूक सत्याग्रहअखिल भारतीय आदिवासी युवा परिषद चंद्रपूरच्या वतीने जागतिक आदिवासी दिवस तथा ९ आॅगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून ३३ अन्यायग्रस्त आदिवासींच्या न्याय हक्कासाठी बुधवारी सकाळी ९ ते १० वाजेपर्यंयत जटपुरा गेट येथील महात्मा गांधीजींच्या पुतळ्याखाली सांकेतिक मूक सत्याग्रहाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रम हा अखिल भारतीय आदिवासी युवा परिषद चंद्रपूरचे अध्यक्ष अ‍ॅड. विकास धकाते व महासचिव विजय सोनकुसरे यांच्या नेतृत्वात घेण्यात आला. सत्याग्रहात रवी उमाटे, किरण खाडीलकर, नरेंद्र बैरम, कविता जुनोनकर, दीपक खाडीलकर, विश्वास निमजे, विनोद धकाते, शितल सोरते, अनिता बैरम, नितीमा नंदूरकर, लता चिमूरकर, रश्मी नंदूरकर, रूपेश धकते, स्मिता धकाते, वसुधा सोरते, प्रगती महतकर व समाज बांधव सहभागी झाले होते.