शहरं
Join us  
Trending Stories
1
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
2
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
3
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
4
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
5
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
6
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
7
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
8
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
9
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
10
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
11
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
12
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
13
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
14
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
15
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
16
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
17
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
18
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
19
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण व शहरी वर्गवारी करून प्राधिकरणाची सरसकट वसुली बंद करा

By admin | Updated: May 3, 2015 01:47 IST

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणद्वारे ग्राहकांची ग्रामीण, शहरी अशी वर्गवारी न करता सरसकट देयक आकारले जात आहे़ यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत़ ...

वर्धा : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणद्वारे ग्राहकांची ग्रामीण, शहरी अशी वर्गवारी न करता सरसकट देयक आकारले जात आहे़ यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत़ ही दरवाढ कमी करण्यात यावी, अशी मागणी आम आदमी पार्टीच्यावतीने करण्यात आली आहे़ याबाबत जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित अधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले़ पिपरी मेघे येथील ग्रामीण पाणी पुरवठा योजनेंतर्गत अकरा गावांना पाणी पुरवठा केला जातो़ यात ग्रामीण भागाचे दर प्रती युनीट ६.६० रुपये नुसार किमान दर प्रतिमाह ७० रुपये लागू करणे गरजेचे होते; पण प्राधिकरणने ग्राहकांची वर्गवारी न करता सर्वांची वर्गवारी शहरी भागात करून शहरी भागाचे प्रती युनिट १४.० रुपये व किमान वापराचे दर प्रतिमाह १४० रुपये लागू करून वसुली केली़ पिपरी मेघे ग्रामीण पाणी पुरवठा योजनेच्या प्रारंभापासूनच प्राधिकरण अकरा गावांतील जनतेची लूट करीत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे़ चार वर्षांपूर्वी जिल्हा ग्राहक मंचाने सकारात्मक निर्णय दिला आहे; पण प्राधिकरणने राज्य ग्राहक आयोगाकडून या निर्णयावर स्थगिती मिळविली़ चार वर्षानंतर राज्य ग्राहक आयोगाच्या अध्यक्षांनी निकाल देणे आमच्या अधिकार कक्षेत बसत नसल्याचे जाहीर केले़ ही खेदाची व बाब आहे. वस्तुस्थिती व भोंगळ कार्यपद्धती लक्षात घेऊन जीवन प्राधिकरणला वेळोवेळी आदेशित केल्यानुसार ग्रामीण भागातील ग्राहकांना ग्रामीण दर लागू करून द्यावे, अधिकची केलेली वसुलीची रक्कम पुढील बिलाशी समायोजित करून द्यावी़ ग्रामीण जनतेची ही समस्या १५ दिवसांत सोडवून निकाली काढावी़ अन्यथा जनशक्ती संघटीत करून तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही आपच्या अंजली दमानीया, सामाजिक कार्यकर्त्या प्रतीभा शिंदे यांनी दिला आहे. यावेळी पदाधिकारी उपस्थित होते़(कार्यालय प्रतिनिधी)