सोयाबीन पेरले, उगवलेही; हाती आला मातेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2020 05:00 AM2020-11-23T05:00:00+5:302020-11-23T05:00:02+5:30

जामनी येथील शेतकरी सुरेश कामडी यांनी खरीप हंगामाच्या सुरुवातीला तीन एकर शेतात सोयाबीन पिकाची लागवड केली. सुरुवातीला झालेला पाऊस आणि पिकाची योग्य पद्धतीने निगा राखल्याने पिकाची वाढही बऱ्यापैकी झाली. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला पिकाची परिस्थिती पाहिल्यावर भरघोस उत्पन्न होईल,असे हा शेतकरी सांगत होता. मात्र, सप्टेंबर महिन्यात झालेल्या सततच्या पावसाचा उभ्या सोयाबीन पिकाला चांगलाच फटका बसला.

Soybeans are sown and grown; Mother came in handy | सोयाबीन पेरले, उगवलेही; हाती आला मातेरा

सोयाबीन पेरले, उगवलेही; हाती आला मातेरा

Next
ठळक मुद्देजामणी येथील शेतकऱ्याची व्यथा : लागवड खर्चही ठरला व्यर्थ; आर्थिक मदत देण्याची शेतकरी बांधवांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
चिकणी (जामनी) : यंदाच्या वर्षी सततच्या पावसाचा सोयाबीन उत्पादकांना चांगलाच आर्थिक फटका बसला. नजीकच्या जामनी येथील एका शेतकऱ्याला तीन एकरात सोयाबीनचे उत्पन्न घेण्यासाठी २८ हजार रुपयांचा खर्च आला. पण प्रत्यक्षात सोयाबीनची मळणी केल्यावर शेतकऱ्याला दीड क्विंटल सोयाबीनच्या मातीऱ्यावर समाधान मानावे लागल्याने केलेला खर्चही व्यर्थ ठरला .
जामनी येथील शेतकरी सुरेश कामडी यांनी खरीप हंगामाच्या सुरुवातीला तीन एकर शेतात सोयाबीन पिकाची लागवड केली. सुरुवातीला झालेला पाऊस आणि पिकाची योग्य पद्धतीने निगा राखल्याने पिकाची वाढही बऱ्यापैकी झाली. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला पिकाची परिस्थिती पाहिल्यावर भरघोस उत्पन्न होईल,असे हा शेतकरी सांगत होता. मात्र, सप्टेंबर महिन्यात झालेल्या सततच्या पावसाचा उभ्या सोयाबीन पिकाला चांगलाच फटका बसला. त्यामुळे सोयाबीन काळे पडले. चिकणीसह परिसरात तीन-चार दिवसांपासून उघडीप दिल्यामुळे कामडी यांनी हार्वेस्टरच्या सहाय्याने मळणी केली.
मळणीअंती त्यांना काळे व मातीमिश्रित दीड क्विंटल सोयाबीनचे उत्पन्न झाले. हे सोयाबीन बाजारात कोणत्या दराने विकल्या जाईल, हेही सांगणे कठीण आहे. यामुळे शेतीत नफा तर सोडाच; मुद्दलही निघाले नाही. आधी कोरोना, नंतर अतिपावसाने शेतपिकांचे नुकसान झाले. यामुळे कामडींसह परिसरातील शेतकऱ्यांची सोयाबीनची शेती तोट्याची ठरली. हवालदिल शेतकऱ्यांनी नुकसानभरपाईची मागणी केली आहे.

सततच्या पावसाचा चांगलाच आर्थिक फटका बसला आहे. जामनी गावात प्रत्येक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याची हीच स्थिती आहे. लागवड खर्चही निघाला नसल्याने पुढील अर्थचक्र कसे चालवावे, ही गंभीर समस्या उभी ठाकली आहे. शासनाने भरीव मदत करावी.
- सुरेश कामडी, शेतकरी, जामनी (चिकणी).

Web Title: Soybeans are sown and grown; Mother came in handy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती