शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनचा पेरा घटण्याचे संकेत

By admin | Updated: June 14, 2014 23:47 IST

तालुक्यात येत्या खरीप हंगामात कापसाच्या पेऱ्यात वाढ होणार असून सोयाबीनच्या पेऱ्यात घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पावसाचेही प्रमाण यंदा कमी असणार अशी शक्यता असल्याने शेतकरी वर्ग चिंतेत

घोराड : तालुक्यात येत्या खरीप हंगामात कापसाच्या पेऱ्यात वाढ होणार असून सोयाबीनच्या पेऱ्यात घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पावसाचेही प्रमाण यंदा कमी असणार अशी शक्यता असल्याने शेतकरी वर्ग चिंतेत दिसत आहे.२०१३-१४ च्या खरीप हंगामात २०.८७१ हेक्टर च्या आसपास कापसाची लागवड तालुक्यात करण्यात आली होती. तर १९.००५ हेक्टरमध्ये सोयाबीनचा पेरा झाला होता. पण गेल्या खरीप हंगामात पेरणी झाल्यापासूनच दमदार पावसाने लावलेल्या हजेरीचे रूपांतर अतिवृष्टी झाल्याने शेती खरडून निघाली. त्यामुळे पराटी पिकांची नासाडी झाली. तद्नंतर सोयाबीन कापणी व मळणीच्या वेळी आलेल्या सततच्या पावसाने सोयाबीन ओलेचिंब झाले. याचा फटका बसून भाव घसरले. त्यामुळे विविध कंपण्यानी सध्या विक्रीस आणलेली सोयाबीनची बियाणे महागली आहे. पण पेरल्यानंतर ती योग्य प्रकारे उगवतील का, याबाबत शेतकरी साशंक असून पराटी पेरण्याकडेच शेतकरी वर्गाचा कल दिसत आहे. यंदा कमी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. या कारणाने नोयोजन कसे करावे असा प्रश्न शेतकरी वर्गाला पडला आहे. पण गत वर्षीच्या तुलनेत यंदा सोयाबीनचे क्षेत्रात घटणार असून कापसाचे क्षेत्र वाढणार असे चित्र दिसत आहे. पीक कुठलेही असो पण निसर्गाने साथ द्यावी आणि पिकाला चांगला भाव मिलावा अशी आशा परिसरातील शेतकरी व्यक्त करीत आहे.मृग नक्षत्र सुरू आहे. मात्र पाऊस न आल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे.(वार्ताहर)