शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

सामूहिक अत्याचारप्रकरणी सहा आरोपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 05:00 IST

पीडिता आपल्या पतीसह सावंगी (मेघे) येथे आली असता शेखर चंदनखेडे याने मुलाखतीच्या बहाण्याने सेलसुरा येथील फार्महाऊसवर नेले. पतीला बाहेर थांबवून फार्महाऊस आधीच असलेल्या पाच जणांसह सर्वांनी आळीपाळीने अत्याचार करुन कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

ठळक मुद्देमुलाखतीच्या बहाण्याने नेले फार्महाऊसवर : वाहनांचा शोध सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नोकरीचे आमिष दाखवून मुलाखतीच्या बहाण्याने पीडितेला फार्महाऊसवर नेत हातपाय बांधून आळीपाळीने सहा आरोपींनी अत्याचार केल्याची घटना शनिवारी रात्री उघडकीस आली होती. याप्रकरणी सावंगी (मेघे) पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली.शेखर सुरेश चंदनखेडे (२४) रा. पवनार, लोकेश उर्फ अभिजीत गजानन इंगोले (२४) रा. तुकाराम वॉर्ड, हेमराज बाबा भोयर (३९) रा. सिंदी (मेघे), नितीन मारोतराव चावरे (२७), राहुल बनराज गाडगे (२८) दोन्ही रा. खरांगणा, पनिंदाकुमार श्रीनिवास बलवा (२६) रा. सिंदी (मेघे) अशी अटक केलेल्यांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. शेखर चंदनखेडे याने सिंदी (रेल्वे) येथील पीडितेला फोन करून नोकरीचे आमिष दाखवून सावंगी (मेघे) येथे बोलाविले. पीडिता आपल्या पतीसह सावंगी (मेघे) येथे आली असता शेखर चंदनखेडे याने मुलाखतीच्या बहाण्याने सेलसुरा येथील फार्महाऊसवर नेले. पतीला बाहेर थांबवून फार्महाऊस आधीच असलेल्या पाच जणांसह सर्वांनी आळीपाळीने अत्याचार करुन कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. पिडीतेने बाहेर येवून सारा प्रकार पतीला सांगताच सावंगी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार रेवचंद सिंगणजुडे यांच्या चमूने घटनास्थळ गाठून फार्महाऊसचा पंचनामा केला असता काही आक्षेपार्ह वस्तू तेथे मिळून आल्या. पोलिसांनी अवघ्या काही तासांतच सहाही आरोपींना अटक केली असून पीडितेला जिल्हा सामान्य रूग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले.मुख्य आरोपी होता पीडितेच्या संपर्कातघटनास्थळावर पहाटेपर्यंत पंचनामा करुन आरोपींचे कपडे, वाहन, मोबाईल आदींचा शोध घेतला. मुख्य आरोपी शेखर चंदनखेडे याने पीडितेचा मोबाईल क्रमांक मिळवून मागील आठ दिवसांपासून तो तिच्या संपर्कात होता. शेखर पीडितेला वारंवार फोन करून नोकरीचे आमिष देत भेटण्यास बोलवित होता. शेखरला पवनार येथून अटक केली असून तो एका सावजी हॉटेलमध्ये आचारी म्हणून काम करतो.आरोपींमध्ये डॉक्टरचा वाहनचालकसामूहिक अत्याचार प्रकरणात अटक केलेल्या आरोपींमधील हेमराज भोयर हा शहरातील एका प्रतिष्ठित डॉक्टराच्या वाहनावरील चालक असल्याची माहिती पुढे आली आहे. इतकेच नव्हेतर ज्या फार्महाऊसमध्ये घटना घडली ते त्याच डॉक्टरचे असल्याची माहिती आहे.

टॅग्स :Socialसामाजिक