शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
3
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
4
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
5
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
6
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
7
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
8
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
9
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
10
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
11
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
12
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
13
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
14
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
15
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
16
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
17
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
18
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
19
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात १४५ गावांवर पाणीटंचाईचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 06:00 IST

उन्हाळ्यात जिल्ह्यातील आठही तालुक्यात राहणाºया नागरिकांना प्रत्येक वर्षी पाणीटंचाईच्या झळा जाणवतात. त्यामुळे संभाव्य पाणीटंचाईच्या झळांपासून नागरिकांना दिलासा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाला पाणी टंचाई कृती आराखडा सादर करण्यात येतो. या आराखड्यात संभाव्य पाणी टंचाईग्रस्त गावात करावयाच्या उपाययोजना सुचविण्यात येतात यावर्षी जिल्ह्यातील आठ तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार झाला आहे.

ठळक मुद्दे२ कोटी ६९ लाख ७८ हजारांचा खर्च अपेक्षित

चैतन्य जोशी।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : येत्या उन्हाळ्यात जानेवारी २०२० ते मार्च पर्यंतच्या दुसऱ्या टप्प्यांतील आरखड्यानुसार पाणीटंचाई दूर करण्यासाठी जिल्ह्यासाठी १०४ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. या उपाययोजना संभाव्य टंचाईग्रस्त १४५ गावांसाठी प्रस्तावित करण्यात आल्या असून एकूण २ कोटी ६९ लाख ७८ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे.उन्हाळ्यात जिल्ह्यातील आठही तालुक्यात राहणाºया नागरिकांना प्रत्येक वर्षी पाणीटंचाईच्या झळा जाणवतात. त्यामुळे संभाव्य पाणीटंचाईच्या झळांपासून नागरिकांना दिलासा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाला पाणी टंचाई कृती आराखडा सादर करण्यात येतो. या आराखड्यात संभाव्य पाणी टंचाईग्रस्त गावात करावयाच्या उपाययोजना सुचविण्यात येतात यावर्षी जिल्ह्यातील आठ तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार झाला आहे. आराखड्यानुसार १४५ गावांमध्ये उन्हाळ्यात पाणी टंचाईची स्थिती उद्भवू शकते. त्यासाठी जिल्ह्यात १०४ उपाययोजना सुद्धा पाणीपुरवठा विभागाने प्रस्तावित केल्या आहेत.संबंधीत कामे हिवाळ्यात सुरू करून नागरिकांना उन्हाळ्यात पाणीपुरवठा सुरू करावा, यासाठी संबंधित उपाययोजनांना जिल्हाधिकाऱ्यांनी लवकरच मंजुरी देणे अपेक्षित आहे. ग्रामीण पुरवठा विभागाच्यावतीने उन्हाळ्यात उपाययोजना मंजुरीसाठी जिल्हाधिकाºयांकडे पाठविण्यात येतात. त्यानंतर त्याला मंजुरी मिळण्यास विलंब होते. परिणामी, उन्हाळा संपल्यानंतर उपाय योजनांची कामे सुरू होतात. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाने पाणी टंचाई उपाय योजनांच्या गावाची यादीसह कृषी आराखडा शासनाला पाठविला आहे. त्यात जानेवारी ते मार्च २०२० या ३ महिन्यातील तीव्र पाणीटंचाई दूर करण्यासाठी एकूण प्रस्तावित १४५ गावांसाठी एकूण १०४ उपायोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहे. या उपाययोजनांना २ कोटी ६९ लाख ७८ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. यामध्ये आर्वी तालुक्यातील २८ गावांसाठी ४८ उपायोजना, आष्टी तालुक्यातील २३ गावांसाठी ३०, कारंजा तालुक्यातील ४९ गावांसाठी ६९, सेलू तालुक्यातील २ गावांकरिता ४, हिंगणघाट तालुक्यातील १० गावांसाठी १२, समुद्रपूर तालुक्यातील ३३ गावांसाठी ३५ उपयायोजनांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.अधिग्रहित विहिरींचा समावेशआर्वी तालुक्यातील २८ ठिकाणी २० विहिरी, आष्टी तालुक्यातील २३ ठिकाणी १२, कारंजातील ४९ ठिकाणी २७, सेलू २ ठिकणी २, हिंगणघाट तालुक्यातील १० ठिकाणी ५, समुद्रपूर तालुक्यातील ३३ ठिकाणी २ खासगी विहिरी अधिग्रहण करण्यात येणार असल्याचे अपेक्षीत आहे.

टॅग्स :water shortageपाणीकपात