शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

सात गावातील लाभार्थ्यांचा जागेच्या पट्ट्याकरिता जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 06:00 IST

तालुक्यातील गौळ, वाटखेडा, कोळोणा, काजळसरा, गणेशपूर, मुरदगाव (खोसे) व लोणी आदी गावातील अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील नागरिकांचा गेल्या ३५ वर्षापासून अतिक्रमणाच्या जागेवर अधिवास आहे. या ठिकाणी कवेलू व ताटव्याच्या झोपडीत संसार थाटला आहे. याच ठिकाणी शासनाने रमाई व शबरी योजने अंतर्गत त्यांच्या घरकुलाचे प्रकरणे मंजूर केले आहे.

ठळक मुद्देतहसीलदारांना निवेदनातून साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : घरकुल योजनेतच्या लाभार्थ्यांच्या अनेक समस्या कायम असल्याने शासनाने लाभार्थ्यांची जागा नियमानकूल करुन त्यांना जागेचे पट्टे द्यावे तसेच दिनदयाल योजनेअंतर्गत जागा विकत घेण्यासाठी अनुदान द्यावे, यासह असंख्य मागण्यांकरिता सात गावातील लाभार्थ्यांनी तहसील कार्यालयावर धडक देऊन तसहसीलदार राजेश सरवदे यांना निवेदन देत मागण्यांची पूतर्ता करण्यासाठी साकडे घातले आहे.तालुक्यातील गौळ, वाटखेडा, कोळोणा, काजळसरा, गणेशपूर, मुरदगाव (खोसे) व लोणी आदी गावातील अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील नागरिकांचा गेल्या ३५ वर्षापासून अतिक्रमणाच्या जागेवर अधिवास आहे. या ठिकाणी कवेलू व ताटव्याच्या झोपडीत संसार थाटला आहे. याच ठिकाणी शासनाने रमाई व शबरी योजने अंतर्गत त्यांच्या घरकुलाचे प्रकरणे मंजूर केले आहे. परंतु संबंधितांची घरे अतिक्रमणाच्या जागेत असल्याने त्यांना शासकीय योजनेतील घरे मिळण्यास अडचण निर्माण झाली आहे. अतिक्रमणाच्या जागेत असलेली घरे नियमानुकूल करण्यासाठी शासनाने एक परिपत्रक काढून पंचायत समिती व ग्रामपंचायत कार्यालयाला कळविले होते. परिशिष्ट-अ मध्ये या जागेचा समावेश करुन कारवाई करण्याचे अपेक्षित असताना संबंधित कार्यालयाने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे या लाभार्थ्यांना शासकीय जागेचे पट्टे मिळण्यास विलंब होत आहे. नियमानुकूल झालेल्या जागेवरच घरकुल देण्याचे शासनाचे धोरण असतानाही हे लाभार्थी घरापासून वंचित आहे. पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांना दिनदयाल योजनेंतर्गत जागा विकत घेण्यासाठी अनुदानाची तरतुद आहे. परंतु रमाई व शबरी योजनेतील लाभार्थ्यांसाठी ही तरतुद नसल्याने त्यांच्यात अन्यायाची भावना आहे. त्यामुळे शासनाने लाभार्थ्यांची जागा नियमानुकूल करुन त्यांना जागेचे पट्टे द्यावे. तसेच दिनदयाल योजनेअंतर्गत जागा विकत घेण्यासाठी अनुदान द्यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. पंचायत समितीचे माजी उपसभापती मारोती लोहवे यांच्या नेतृत्वात किरण राऊत, नंदू भस्मे, अशोक डोंगरे, विवेक मून व लाभार्थ्यांची उपस्थिती होती.

टॅग्स :Tahasildarतहसीलदार