कोरोनाशी लढण्यास सावंगी रुग्णालय सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 05:00 AM2020-03-25T05:00:00+5:302020-03-25T05:00:09+5:30

कोरोना हे देशावर आलेले संकट असले तरी आपण सारे आरोग्य क्षेत्रातले लढवय्ये असल्यामुळे भयभीत होण्याचे कारण नाही. आरोग्यावरील या संकटाशी लढण्यास सावंगी रुग्णालयाची संपूर्ण यंत्रणा सज्ज असून राष्ट्रीय कर्तव्य म्हणून डॉक्टरांपासून नर्स आणि वॉडर् बॉयपर्यंत सर्वांनी २४ तास कार्य तत्पर असावे, असे निर्देश दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्थेचे व्यवस्थापन मंडळ सदस्य सागर मेघे यांनी आपत्ती निवारणाचा आढावा घेताना दिले.

Sawangi Hospital ready to fight Corona | कोरोनाशी लढण्यास सावंगी रुग्णालय सज्ज

कोरोनाशी लढण्यास सावंगी रुग्णालय सज्ज

Next
ठळक मुद्देसागर मेघे : रुग्णांची स्वतंत्र तपासणी व भरती व्यवस्था

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोना हे देशावर आलेले संकट असले तरी आपण सारे आरोग्य क्षेत्रातले लढवय्ये असल्यामुळे भयभीत होण्याचे कारण नाही. आरोग्यावरील या संकटाशी लढण्यास सावंगी रुग्णालयाची संपूर्ण यंत्रणा सज्ज असून राष्ट्रीय कर्तव्य म्हणून डॉक्टरांपासून नर्स आणि वॉडर् बॉयपर्यंत सर्वांनी २४ तास कार्य तत्पर असावे, असे निर्देश दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्थेचे व्यवस्थापन मंडळ सदस्य सागर मेघे यांनी आपत्ती निवारणाचा आढावा घेताना दिले.
शासनाच्या निर्देशांची काटेकोर अंमलबजावणी करीत रुग्णालयात कार्यरत प्रत्येक कर्मचाऱ्याला आरोग्य सेवेतील योद्ध्याची भूमिका बजावायची आहे. गरज भासल्यास मेघे समूहातील अन्य कर्मचारी वृंदालाही या आणिबाणीच्या काळात सावंगी रुग्णालयात नियुक्त करण्यात येईल. मात्र कोणत्याही परिस्थितीत सामान्य रुग्ण तसेच कोरोनाबाबत संशयित किंवा बाधित रुग्णांची गैरसोय होणार नाही आणि हा संसर्ग वाढणार नाही, याची पुरेपूर दक्षता घेतली जाईल, असेही सागर मेघे म्हणाले. सध्या सावंगी मेघे रुग्णालयात २४ तास सेवा देणारी २०० कर्मचाऱ्यांची स्वतंत्र चमू तीन पाळ्यांमध्ये कार्यरत करण्यात आली असून गरज भासल्यास त्यात वाढ करण्यात येईल, असेही यावेळी सांगण्यात आले. वैद्यकीय सुविधेसाठी सर्वसामान्य रुग्ण आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात तर विशेष रूग्ण शालिनीताई मेघे सुपर स्पेशालिटी केंद्रात ठेवण्याची स्वतंत्र यंत्रणाही उभारण्यात आली आहे. संशयित रुग्णांसाठी कृत्रिम श्वसनयंत्रणा असलेला ३० रुग्णखाटांचा स्वतंत्र विभाग तर बाधित रुग्णांसाठी अत्याधुनिक सेवा देणारे पाच बेड राखून ठेवण्यात आले आहेत. अन्य कारणाने आवश्यकता असलेल्या सामान्य व संशयित रुग्णांसाठी वेगवेगळी शस्त्रक्रियागृहेही कार्यान्वित करण्यात आली आहेत. रुग्णालयात येणाºया प्रत्येक रुग्णाची पूर्वतपासणी केली जात असून त्यासाठी स्क्रिनिंग काऊंटर उभारण्यात आले आहेत. याशिवाय, ठिकठिकाणी हॅण्डवॉश सुविधेसोबतच मास्क, सॅनेटायझर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. रुग्णांव्दारे आलेला कोणताही फोन टाळू नका, उलट त्यांना दिलासा देत आरोग्यसेवा उपलब्ध करून द्या, असे निर्देशही यावेळी डॉक्टरांना देण्यात आले. यासोबतच वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, भौतिकोपचार, नर्सिंग व अन्य महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना सुट्ट्या देण्यात आल्या असून परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या विद्यार्थ्यांसाठी मोबाईल आणि लॅपटॉपवर आॅनलाईन वर्ग सुरू करण्यात आले आहेत. तर कर्मचारी वर्गासाठी कोरोना आपत्ती व रुग्ण व्यवस्थापनाच्या दृष्टीने विशेष प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. रुग्णबस सध्या गर्दीतूून होणारा संसर्ग टाळण्यासाठी बंद करण्यात आल्या.

Web Title: Sawangi Hospital ready to fight Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.