शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

उगमपत्र नसल्याने रोखली आठ लाखांच्या बियाण्यांची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 05:00 IST

खरीप हंगाम सुरू झाला असून बियाणे व खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची कृषी केंद्रांवर गर्दी होत आहे. अशात बाजारपेठेत बोगस बियाण्यांचा शिरकाव होण्याची शक्यता असल्याने कृषी विभागाच्यावतीने एकूण नऊ भरारी पथक तयार करण्यात आले आहे. याच पथकांनी मागील तीन दिवसांत विशेष मोहीम हाती घेऊन १५ ते २० कृषी सेवा केंद्र व गोदामांची तपासणी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पावसाचे आगमन होताच बियाणे खरेदीसाठी शेतकरी कृषी केंद्रांमध्ये गर्दी करतात. याच दरम्यान बोगस बियाणेही बाजारपेठेत येत त्याची विक्री होते. बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये या हेतूने कृषी विभागाकडून सध्या धडक कृषी केंद्र तपासणी मोहीम राबविली जात आहे. याच मोहिमेदरम्यान ११ कृषी केंद्रांमध्ये उगमपत्र नसलेले आठ लाख रुपये किंमतीचे बियाणे आढळून आल्याने त्या बियाण्यांच्या विक्रीला ब्रेक लावण्यात आला आहे. शिवाय सदर कृषी केंद्र व्यावसायिकांना त्या बियाण्यांबाबतचे आवश्यक कागदपत्र दहा दिवसांत सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.खरीप हंगाम सुरू झाला असून बियाणे व खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची कृषी केंद्रांवर गर्दी होत आहे. अशात बाजारपेठेत बोगस बियाण्यांचा शिरकाव होण्याची शक्यता असल्याने कृषी विभागाच्यावतीने एकूण नऊ भरारी पथक तयार करण्यात आले आहे. याच पथकांनी मागील तीन दिवसांत विशेष मोहीम हाती घेऊन १५ ते २० कृषी सेवा केंद्र व गोदामांची तपासणी केली. या मोहिमेदरम्यान दुकानदाराचे बियाणे, खत, किटकनाशके परवाना, साठा नोंदवही, बिल बुक, विक्री करीत असलेले बियाणे, खताचे उगमपत्राची तपासणी करण्यात आली.कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या पाहणीत जिल्ह्यातील अकरा कृषी केंद्रांमध्ये उगमपत्र नसलेले आठ लाख रुपये किंमतीचे बियाणे आढळून आल्याने त्याच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. शिवाय सदर कृषी केंद्र व्यावसायिकांना त्यांची बाजू मांडण्यासह आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी दहा दिवसांचा वेळ देण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे यांच्या मार्गदर्शनात कृषी उपसंचालक अजय राऊत, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक पी. ए. घायतिडक यांनी केली असून सदर मोहीम आणखी काही दिवस सुरू राहणार आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्र