आर. आर. नावाने बोगस बियाणे बाजारात

By Admin | Updated: June 11, 2014 23:26 IST2014-06-11T23:26:42+5:302014-06-11T23:26:42+5:30

बाजारात किंवा इतर व्यक्तीद्वारे महाशक्ती आर. आर. किंवा बी.जी. ३ इत्यादी नावाने बोगस बियाण्यांची विक्री होत आहे. यामुळे शेतकरी बांधवांनी सावधान राहावे, असे आवाहन जिल्हा कृषी विकास अधिकारी

R. R. The name of the bogus seed market by name | आर. आर. नावाने बोगस बियाणे बाजारात

आर. आर. नावाने बोगस बियाणे बाजारात

कृषी विभागाची माहिती: सावधानतेचा इशारा
वर्धा : बाजारात किंवा इतर व्यक्तीद्वारे महाशक्ती आर. आर. किंवा बी.जी. ३ इत्यादी नावाने बोगस बियाण्यांची विक्री होत आहे. यामुळे शेतकरी बांधवांनी सावधान राहावे, असे आवाहन जिल्हा कृषी विकास अधिकारी आर. के. गायकवाड यांनी केले आहे.
अनाधिकृत कंपनीने किंवा इतर प्रतिनिधीद्वारे पेरणीसाठी बियाणे बाजारात येत आहेत. ही बियाणे कोणत्याही प्रकारची चाचणी न होता बाजारात आलेले आहेत. त्यामुळे अशा बियाण्यापासून शेतकऱ्यांचे नुकसान होते. अशा अनधिकृत खरेदी केलेल्या बियाण्याचे कोणताही परवाना नसतो. त्यामुळे अशा बोगस बियाण्यामुळे नुकसान झाल्यास कोणतीही नुकसान भरपाई शासनामर्फत मिळू शकत नसल्याचेही कृषी विकास अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.(जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: R. R. The name of the bogus seed market by name