शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

तत्पर वीजसेवेसाठी स्वतंत्र सबस्टेशन द्या

By admin | Updated: July 27, 2014 00:14 IST

सद्यपरिस्थितीत विद्युत वितरण कंपनीने कारंजा शहर व इतर १५ गावांना मिळून विद्युत सेवा देण्याकरिता कारंजा सबस्टेशन दिलेले आहे. पण कामाचा व्याप, गावांची संख्या आणि वाढती वीज

कारंजा(घा.) : सद्यपरिस्थितीत विद्युत वितरण कंपनीने कारंजा शहर व इतर १५ गावांना मिळून विद्युत सेवा देण्याकरिता कारंजा सबस्टेशन दिलेले आहे. पण कामाचा व्याप, गावांची संख्या आणि वाढती वीज मागणी लक्षात घेता कारंजा शहराकरिता एक स्वतंत्र सबस्टेशन तर इतर १५ गावाकरिता दुसरे स्वतंत्र सबस्टेशन देण्यात यावे, अशी मागणी कारंजावासीनी तालुका ग्राहक पंचायत मार्फत संबंधितांकडे केली आहे. इंदिरा नगर परिसरात असलेल्या कारंजा सबस्टेशनला सध्या कारंजा या १५ हजार लोकसंख्येच्या गावासह नारा, आजनादेवी, सावरडोह, बेलगाव, खापरी, वाघोडा, तरोडा, काकडा, परसोडी, बिहाडी, मदनी, खैरी, सेलगाव(लवणे), चंदेवानी, गोदनी अशी पंधरा गावे जोडलेली आहे. कारंजा शहरात ४ हजार विद्युत ग्राहक व १०० कृषी ग्राहक आहेत. त्याचप्रमाणे १५ गावात सुद्धा ४ हजार ५०० विद्युत ग्राहक आणि १०० कृषी ग्राहक आहे. एवढ्या ८ हजार ५०० विद्युत ग्राहक आणि २०० कृषी ग्राहकांचा कारभार सांभाळणे आणि तत्पर सेवा देणे उपअभियंता आणि कर्मचाऱ्यांना कठीण जात आहे. कारंजा शहरात पोलीस स्टेशन, तीन कॉलेज, पाच शाळा, दवाखाना, तहसील, कृषी विभाग, पंचायत समिती, बांधकाम विभाग, कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी विक्री संघ अशी महत्त्वाची कार्यालये आहे. या सर्व कार्यालयाना तत्पर व सलग विद्युत सेवा देणे गरजेचे असते. ही सेवा एकच सबस्टेशन, कामाचा व्याप व ग्राहकांची वाढती संख्या यामुळे योग्य प्रकारे देता येत नाही. तसेच कर्मचाऱ्यांची संख्या सुद्धा कमी असल्यामुळे हाब त्रास होत आहे. या दृष्टीने लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे, अशी मागणी जनतेतून होत आहे.(तालुका प्रतिनिधी)