शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

राहूल गांधींच्या सभेसाठी सर्कस मैदान सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 23:33 IST

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून सुरू होणाऱ्या काँग्रेसच्या पदयात्रेचा समारोप २ आॅक्टोबरला रामनगर भागातील सर्कस मैदानावर होणार आहे.

ठळक मुद्देयुद्धपातळीवर कामे सुरू : ४८ बाय ६४ चौरस फुटाचे व्यासपीठ होतेय तयार

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून सुरू होणाऱ्या काँग्रेसच्या पदयात्रेचा समारोप २ आॅक्टोबरला रामनगर भागातील सर्कस मैदानावर होणार आहे. या समारोपीय कार्यक्रमादरम्यान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. राहूल गांधी नागरिकांना व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. खा. राहूल गांधी यांच्या जाहीर सभेसाठी सध्या रामनगर भागातील सर्कस मैदान सज्ज होत आहे. नियोजित कामे सध्या युद्धपातळीवर केले जात असून या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीकोणातून योग्य उपाययोजनाही केल्या जात आहेत.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहूल गांधी यांच्या सर्कस मैदान येथे पार पडणाऱ्या जाहीर सभेला सुमारे ४० हजाराच्यावर नागरिक उपस्थित राहणार असल्याचे बोलले जात आहे. या जाहीर सभेच्यापूर्वी स्थानिक सिव्हील लाईन भागातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून ‘गांधी संदेश यात्रा’ काढण्यात येणार आहे. ही पदयात्रा वर्धा शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करून रामनगर भागातील सर्कस मैदान येथे पोहोचणार आहे. ही पदयात्रा वर्धा शहारातील ज्या प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करणार आहे त्या मार्गावरील वाहतूक इतर मार्गाने वळती करण्यात येणार आहे. कुठल्या कुठल्या मार्गावरील वाहतूक किती वेळेकरिता इतर मार्गाने वळती करण्यात येईल यासाठीच्या नियोजनाला अंतीम स्वरूप सध्या वाहतूक नियंत्रण शाखेचे अधिकारी देत आहेत. तर ज्या ठिकाणी खा. राहूल गांधी यांची जाहीर सभा होणार आहे त्या सर्कस मैदानावर सध्या तात्पूर्वी पोलीस चौकी तयार करण्यात आली आहे. त्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीकोणातून एक पोलीस अधिकारी व चार कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या मैदानावर होत असलेल्या प्रत्यक गोष्ठींवर लक्ष ठेवून आहेत. सभा स्थळी ४८ बाय ६४ फुट मोठे असे भव्य व्यासपीठ उभारले जात असून सर्कस मैदानात सभा ऐकण्यासाठी येणाऱ्या महिला व पुरुषांसाठी वेगवेगळी व्यवस्था करण्यात येत आहे. इतकेच नव्हे तर काँग्रेसच्या पुढाºयांना बसण्यासाठी व्यासपीठाच्या पुढील बाजूला वेगळी आसनव्यवस्था करण्यात येत आहे. सर्कस मैदानातील जाहीर सभेचा व्यासपीठ तयार करणे व तेथील बैठक व्यवस्थेची जबाबदारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नांदेड येथील एका मंडप-डेकोरेशन व्यावसायिकाला देण्यात आली आहे. सुमारे ५० व्यक्ती सध्या रात्र-दिवस युद्धपातळीवर कामे पूर्ण केली जात आहेत.

सभास्थळी ३०० पोलीस अधिकारी व कर्मचारी देणार खडा पहारा
स्थानिक रामनगर भागातील सर्कस मैदान येथील खा. राहूल गांधी यांच्या जाहीर सभेदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात येणार आहे. जाहीर सभेच्या सुरक्षेची जबाबदारी रामनगर पोलीस ठाण्याच्या खांद्यावर टाकण्यात आली असून २ आॅक्टोबरला सर्कस मैदानाला बंदोबस्तामुळे पोलीस छावणीचे स्वरूप येणार आहे. सुमारे ३०० पोलीस अधिकारी व कर्मचारी सर्कस मैदान परिसरात खडा पहाराच देणार आहेत. यात १०० महिला पोलीस अधिकारी व कर्मचाºयांचा सहभाग राहणार आहे.
मोठ्या जनरेटरचा होणार वापर
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहूल गांधी यांच्या सभास्थळी जनरेटरचा वापर करून विद्युत कार्यक्रमासाठी घेण्यात येणार आहे. काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी महावितरणकडे अद्यापही विद्युत जोडणीसाठी लेखी मागणी केली नसल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

जाहीर सभा आटोपताच दिग्गजही होतील रवाना
काँग्रेसच्यावतीने आयोजित राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक, पदयात्रा व त्यानंतरच्या जाहीर सभेसाठी वर्धेत व सेवाग्राम येथे दाखल होणारे काँग्रेसचे दिग्गज नेते आयोजित विविध कार्यक्रमांना उपस्थिती दर्शवून सायंकाळी उशिरा वर्धा व सेवाग्राम येथून पुढील प्रवासाकरिता त्याच दिवशी रवाना होणार आहेत.

हेलिपॅडचे काम ४० टक्के पूर्ण
सेवाग्राम परिसरात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहूल गांधी, सोनिया गांधी व माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यासाठी एकूण तीन तात्पूर्ते हेलिपॅड तयार करण्यात येत आहे. सध्यास्थितीत या हेलिपॅड काम ४० टक्के पूर्ण झाले असून उर्वरित काम युद्धपातळीवर पूर्ण केले जात आहे. रविवारी सेवाग्रामचे ठाणेदार संजय बोदे यांच्यासह त्यांच्या सहकार्यांनी हेलिपॅडची पाहणी करून तेथील कामाची माहिती जाणून घेतली. या हेलिपॅडवर सोमवारी चाचणी घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या दौºयामुळे वर्धा शहरातील काही लहान रस्त्यांवरील वाहतूक वळती करण्यात येणार आहे. त्यामुळे काही मार्गाने वाहनचालकांना मंगळवार २ आॅक्टोबरला जाता येणार नसल्याचे पोलिसांनी कळविले आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस