शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
4
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
5
"माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
6
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
7
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
8
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
9
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
10
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
11
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
12
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
13
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
14
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
15
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
16
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
17
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
18
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
19
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
20
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

गावचा कारभार पोलीस पाटलाविना

By admin | Updated: July 27, 2014 00:15 IST

रामदरा (शिर्री) येथे अजूनपर्यंत पोलीस पाटलाचे पद रिक्त आहे. त्यामुळे ग्रामस्थांना गैरसोय सोसावी लागत आहे. रामदरा (शिर्री) गावाचे तळेगाव येथे पुनवर्सन होऊन २५ वर्षे झाले. या गावाची सात

तळेगाव (श्या.पंत) : रामदरा (शिर्री) येथे अजूनपर्यंत पोलीस पाटलाचे पद रिक्त आहे. त्यामुळे ग्रामस्थांना गैरसोय सोसावी लागत आहे. रामदरा (शिर्री) गावाचे तळेगाव येथे पुनवर्सन होऊन २५ वर्षे झाले. या गावाची सात सदस्याची वेगळी ग्रामपंचायत आहे.या गावाचे पुनवर्सन झाले तेव्हापासून सदर ग्रामपंचायतीत निवडणूक न होता सात सदस्य अविरोध निवडून येतात. पण गावामध्ये अद्याप पोलीस पाटलाची नियुक्ती झाली नाही. विद्यार्थ्यांना शालेय कामकाजासाठी पाहिजे असलेले पोलीस पाटलाचे प्रमाणपत्र मिळेनासे झाले आहे. शिवाय अन्य कामेही खोळंबली आहे. प्रमाणपत्र मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. वारंवार मागणी करुनही गावात पोलीस पाटलाच्या नियुक्तीसाठी कुठलेही प्रयत्न करण्यात आलेले नाही. त्याचप्रमाणे तळेगावात एकूण तीन पोलीस पाटलांची नियुक्ती करण्यात आली आहे. या तीन पोलीस पाटलापैकी एका पोलीस पाटलाचे निधन झाले. तेव्हा पासून ही जागा खालीच आहे. एक पोलीस पाटील चार-पाच वर्षापासून गावात राहत नसल्याने ती जागाही रिक्त आहे.२० हजार लोकसंख्या ६ वार्डाच्या गावाचा कारभार सध्या एकाच पोलीस पाटलावर आहे. यामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांचे कामे खोळंबली आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देत या जागा त्वरित भराव्या अशी मागणी नागरिक करीत आहे.(वार्ताहर)