शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

धामनदी पात्रातून पोकलॅन्ड जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 06:00 IST

येथील धाम नदी पात्रात गावाच्याविरुद्ध दिशेवरील काठावर कुठलीही परवानगी न घेता उत्खन्न केले जात असल्याची माहिती काही सुजान नागरिकांनी विजय तपासे यांना दिली. त्यांनी ही माहिती तातडीने सरपंच शालिनी आदमन, पं.स. सदस्य प्रमोद लाडे यांच्यासह तहसीलदार डुडुलकर आणि तलाठ्यांना दिली. माहिती मिळताच सर्वांनी तातडीने घटनास्थळ गाठले. त्यानंतर पोकलॅन्ड जप्त करण्यात आला.

ठळक मुद्देतहसीलदारांची कारवाई : अवैध उत्खन्न माफियांचे धाबे दणाणले

लोकमत न्यूज नेटवर्कपवनार : कुठलीही परवानगी न घेता येथील धाम नदी पात्रात उत्खन्न केले जात असल्याची माहिती मिळताच तहसीलदार प्रिती डुडुलकर यांनी तातडीने घटनास्थळ गाठून एक पोकलॅन्ड जप्त केला. महिला तहसीलदारांच्या या कारवाईमुळे परिसरातील अवैध उत्खन्नमाफियांचे धाबे दणाणले आहेत.येथील धाम नदी पात्रात गावाच्याविरुद्ध दिशेवरील काठावर कुठलीही परवानगी न घेता उत्खन्न केले जात असल्याची माहिती काही सुजान नागरिकांनी विजय तपासे यांना दिली. त्यांनी ही माहिती तातडीने सरपंच शालिनी आदमन, पं.स. सदस्य प्रमोद लाडे यांच्यासह तहसीलदार डुडुलकर आणि तलाठ्यांना दिली. माहिती मिळताच सर्वांनी तातडीने घटनास्थळ गाठले. त्यानंतर पोकलॅन्ड जप्त करण्यात आला. अधिकाऱ्यांच्या अधिक चौकशीत सदर पोकलॅन्ड येळाकेळी येथील विलास घोंगडे यांच्या मालकीचा असल्याचे पुढे आले आहे. इतकेच नव्हे तर या अत्याधुनिक यंत्राच्या सहाय्याने धाम नदी पात्रातून आतापर्यंत मोठ्या प्रमाणात मुरूम चोरून नेण्यात आला. परंतु, चोरीचा मुरूम कुठे विक्री करण्यात आला याबाबतची माहिती अधिकारी जाणून घेत आहेत. या कारवाई प्रसंगी विनय तपासे, प्रमोद लाडे, संजय भोयर, ग्रा. पं. सदस्य राजू बावणे आदींची उपस्थिती होती.माफियांना आशीर्वाद कुणाचा?धाम नदीवरील पुलाचे बांधकाम सुरू असताना मोठ्या प्रमाणात वेस्ट मटेरियल नदी पात्रात टाकण्यात आले. अद्यापही ते काढण्यात आलेले नाही. ही घटना ताजी असतानाच नदी काठचा मुरूम चोरून नेल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. अवैध उत्खन्न माफियांना आशीर्वाद कुणाचा, असा आरोप सरपंच शालिनी आदमने यांनी केला आहे.अवैध उत्खन्नाची माहिती मिळताच तहसीलदारांनी कारवाई केली. तहसीलदारांची कारवाई स्वागतार्ह आहे. परंतु, खोदकाम करणाºयाने नदी पात्रात मोठा खोल खड्डा तयार केला आहे. त्यामुळे भविष्यात मोठा धोका होऊ शकतो. परिणामी सदर खड्डा वेळीच बुजविणे गरजेचे आहे.- शालिनी आदनमे, सरपंच, पवनार.

टॅग्स :sandवाळू