शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

आवडता प्रवास महागल्याने प्रवासी नाराज

By admin | Updated: June 14, 2014 23:47 IST

उन्हाळ्यात बहुतेक जण बाहेरगावी फिरायला जाण्याचा किंवा देवदर्शनासाठी जाण्याचा बेत आखतात. यात वयोवृद्धांचा समावेश जास्त असून सवलत मिळत असल्याने राज्य परिवहन महामंडळाच्या ‘आवडेल तिथे प्रवास’ या

वर्धा : उन्हाळ्यात बहुतेक जण बाहेरगावी फिरायला जाण्याचा किंवा देवदर्शनासाठी जाण्याचा बेत आखतात. यात वयोवृद्धांचा समावेश जास्त असून सवलत मिळत असल्याने राज्य परिवहन महामंडळाच्या ‘आवडेल तिथे प्रवास’ या योजनेचा जास्त लाभ घेतल्या जातो. पण यंदा या योजनेच्या दरातही जूनपासून वाढ झाल्याने प्रवासी वर्गात नाराजी व्यक्त होत आहे. यंदा मागील दरांपेक्षा जवळपास १० ते १५ टक्क्याने वाढ झाली आहे. त्यामुळे आवडीचा प्रवास खिशाला आता परवडणारा झाल्याचे प्रवासी वर्गातून बोलल्या जात आहे. परिणामी, पर्यटन किंवा देवस्थानची परिक्रमादेखील आता महागात पडणार असे बोलल्या जात आहे. कायम तोट्यात असल्याचा शिक्का राज्य परिवहन महामंडळाला बसला आहे. तोट्याच्या नावाखाली परिवहन महामंडळाकडून सातत्याने दरात वाढ केली जाते. अलीकडच्या तीन वर्षात जवळपास दुपटीने सर्वच भाड्यात वाढ झाली. नियमित अंतराने ही वाढ सुरूच असताना पुन्हा प्रवाशांच्या खिशाला कात्री लागली. त्यामुळे ‘आवडेल तिथे प्रवास’ प्रत्येकाला चांगलाच महागात पडणार आहे. आगाराच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच एसटीचा वर्धापनदिन साजरा करताना हळूच राज्य परिवहन महामंडळाने दरात वाढ केली. परिणामी, ४ दिवसांच्या प्रवासासाठी ६५० रूपयांवरून आता ८०० रूपये मोजावे लागतात, पण कमी गर्दीच्या कालावधीत ४ दिवसांसाठी प्रौढांसाठी ७४० तर मुलांसाठी ३७० रूपये मोजावे लागतात. प्रामुख्याने वर्षाची विभागणी दोन गटांत केली असून, १५ आॅक्टोबरपासून ते १४ जूनपर्यंत गर्दीच्या कालावधीत तिकिटांचे वाढीव दर राहणार आहेत. उलट कमी गर्दीच्या १५ जूनपासून ते १४ आॅक्टोंबरपर्यंत तिकिटांत थोडासा दिलासा मिळाला. दुसरीकडे ७ दिवसांच्या प्रवासासाठी प्रौढांना साध्या बससाठी १ हजार ४०० तर मुलांसाठी ७०० रूपये भरून प्रवास करता येणार आहे. निमआराम बससाठी प्रौढांना १ हजार ६०५ तर मुलांसाठी ८०५ रूपये ७ दिवसांच्या प्रवासासाठी भरावे लागतात. सात दिवसांच्या आंतरराज्यीय प्रवासासाठी १ हजार ७३० तर मुलांसाठी ८६५ रूपये भरून प्रवास करता येणार आहे.गर्दीच्या कालावधीसाठी या तिकिटांच्या दरांपेक्षा कमी गर्दीच्या हंगामात आगाराने थोडासा दिलासा दिला. इतर वाहतुकीच्या तुलनेत एसटीचे भाढे वाढत राहिल्याने प्रवाशांना बसचा प्रवास डोईजड होत असल्याचे चित्र दिसत आहे.(शहर प्रतिनिधी)