शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

आता ग्रामस्वच्छता अभियान दुर्लक्षित

By admin | Updated: August 22, 2014 00:03 IST

गाव स्वच्छ व सुंदर दिसावे, ते निर्मलग्राम व्हावे या हेतूने संतांच्या नावाने सुरू झालेले ग्रामस्वच्छता अभियान सध्या थंडबस्त्यात दिसते़ नरेगातील कामाच्या व्यस्ततेमुळे या योजनेकडे जवळपास सर्वच

घोराड : गाव स्वच्छ व सुंदर दिसावे, ते निर्मलग्राम व्हावे या हेतूने संतांच्या नावाने सुरू झालेले ग्रामस्वच्छता अभियान सध्या थंडबस्त्यात दिसते़ नरेगातील कामाच्या व्यस्ततेमुळे या योजनेकडे जवळपास सर्वच ग्रा़पं़ चे दुर्लक्ष झाल्याचे चित्र तालुक्यात पाहावयास मिळत आहे़ यावरून नवीन योजना आल्या की, त्यावर अंमल करायचा आणि जुन्या योजनांकडे पाठ फिरवायची, असाच प्रकार दिसून येतो़तीन वर्षांपूर्वीपर्यंत तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींनी संत गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामस्वच्छता अभियानात हिरिरीने भाग घेतला़ गावातील युवा मंडळींसह ग्रामस्थांनाही स्वच्छ गाव सुंदर गाव याचे महत्त्व जाणवू लागले होते़ या अभियानातून अनेक ग्रामपंचायतींनी गावाचा लौकिक वाढवून पुरस्कार प्राप्त केलेत; पण अलिकडे महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू झाली़ या योजनेच्या बैठकींसाठी ग्रामसेवक पंचायत समिती कार्यालयातच महिन्याचे अर्धेधिक दिवस व्यस्त राहतात़ या कामावरील मजुरांचे मस्टर, हजेरी पत्रक, बँकेत पैसे जमा होईपर्यंत लक्ष ठेवणे, फळबाग, सिंचन विहीर, पांदण रस्ते, रस्त्याच्या दुतर्फा वृक्षलागवड आदी कामांचा यात समावेश आहे़ यामुळे ग्रामसचिवास गाविकासाकडे लक्ष देण्यास वेळच मिळत नसल्याची एकंदरीत परिस्थिती आहे़ योजनेवर लक्ष ठेवण्यासाठी ग्रामरोजगार सेवकाची नियुक्ती केली असली तरी एका मजुराची अनेक कागदपत्रे बनवावी लागत असल्याने तेही व्यस्तच असतात़ ग्रामसचिवावर कामाचा व्याप वाढला असताना एका ग्रामसेवकाकडे दोन-दोन ग्रामपंचायतींचा कारभार असल्याने व अर्धाधिक वेळ पंचायत समिती कार्यालयातच जात असल्याने ग्रामस्थांना ग्रामसचिवाची प्रतीक्षा करावी लागते़ नरेगा योजना चांगली असून यात गावखेड्यात रोजगार उपलब्ध झाला आहे़ रस्त्याच्या दुतर्फा लावलेली वृक्ष मोठे झाल्यानंतर तालुका हिरवागार होईल; पण या योजनेत ग्रामपंचायतींनी सर्वस्व पणाला लावल्याने ग्रामस्वच्छता अभियान सध्या तरी दुर्लक्षित झाल्याचे दिसते़ सध्या नवीन योजना राबविण्यावर भर दिला जात असताना जुन्या चांगल्या योजनांकडे दुर्लक्ष केले जात आहे़ यामुळे सर्व योजनांच्या समतोल अंमलाकरिता उपाययोजना करणे गरजेचे आहे़(वार्ताहर)