शहरं
Join us  
Trending Stories
1
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
2
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
3
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
4
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
7
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
8
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
9
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
10
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
11
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
12
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
13
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
14
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
15
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
16
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
17
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
18
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
19
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
20
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
Daily Top 2Weekly Top 5

उभ्या पिकांवर निसर्गाची वक्रदृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 23:49 IST

कधी नव्हे अशा भीषण जलसंकटाला यंदाच्या उन्हाळ्यात नागरिकांना सामोरे जावे लागले. पाणी समस्येच्या झळा नागरिक सोसत असतानाच हवामान खात्याने सुरुवातीला दमदार पाऊस होण्याची शक्यता वर्तविली. त्यामुळे अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.

ठळक मुद्देबळीराजाच्या नजरा आकाशाकडेपाण्याअभावी करपतेय अंकुरलेले पीक

महेश सायखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कधी नव्हे अशा भीषण जलसंकटाला यंदाच्या उन्हाळ्यात नागरिकांना सामोरे जावे लागले. पाणी समस्येच्या झळा नागरिक सोसत असतानाच हवामान खात्याने सुरुवातीला दमदार पाऊस होण्याची शक्यता वर्तविली. त्यामुळे अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. पण जून महिन्याच्या अखेरच्या दोन दिवसात प्रत्यक्षात वरुणराजा वर्धा जिल्ह्यात बरसला. जूनच्या अखेरच्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे शेतजमीनही बºयापैकी भिजल्याने शेतकऱ्यांनी विविध पिकांची लागवड केली. शिवाय अंकुरून पिकाची वाढही बºयापैकी झाली. परंतु, सध्या पाऊसच बेपत्ता झाल्याने सुमारे १५ दिवसांची ही रोपटी करपत आहेत.यंदाच्या खरीप हंगामात वर्धा जिल्ह्यातील ४ लाख २८ हजार ६२५ हेक्टर जमिनीवर विविध पिकांची लागवड होईल, असा अंदाज होता. परंतु, पाऊस लांबल्याने जुलैच्या दुसºया आठवड्यापर्यंत ३ लाख ३ हजार ७७६.७ हेक्टर शेतजमिनीवर विविध पिकांची लागवड झाल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे. आतापर्यंत केवळ ७०.८७ टक्केच पेरणी झाल्याचे सांगण्यात येते. मात्र, पावसाने दडी मारल्याने ३ लाख ३ हजार ७७६.७ हेक्टर शेतजमिनीवर अंकुरलेले हे पीक करपण्याच्या मार्गावर आहे. ज्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे असे शेतकरी अंकुरलेले पीक वाचविण्यासाठी जीवाचे रान करीत आहेत. दमदार पावसाअभावी शेतातील विहिरींच्या पाणी पातळीत पाहिजे तशी वाढ न झाल्याने सिंचनाची सोय असलेल्या शेतकºयांनाही उभे पीक जगविण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तर कोरडवाहू शेतकºयांची स्थिती अत्यंत हलाखीची आहे. पाऊस आला म्हणून पेरणी केली. पुढेही पावसाचा जोर कायम राहील अशी अपेक्षा होती. परंतु, पाऊसच बेपत्ता झाल्याने उगवलेले पीकही हातचे जाईल, असे सिंचनाची सोय नसलेले शेतकरी सांगतात. सध्या जिल्ह्यात ढगाळी वातावरण आहे;पण पाहिजे तसा पाऊस बरसत नसल्याने शेतकºयांसह नागरिकांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. येत्या काही दिवसात जिल्ह्यात दमदार पाऊस न झाल्यास संपूर्ण पीकच करपण्याची आणि खरीपात शेतजमिनी पडिक ठेवण्याची परिस्थिती शेतकºयांवर ओढावणार असल्याची शक्यता काही कृषी तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे.ढगाळी वातावरण राहिल्यास रोपट्यांचे आयुष्य आठ दिवसांचेपाऊस बेपत्ता झाला असला तरी सध्या वर्धा जिल्ह्यात ढगाळी वातावरण कायम आहे. असेच वातावरण आणखी काही दिवस कायम राहिल्यास अंकुरलेले पीक जास्तीत जास्त आठ दिवस दमधरून राहिल. तर ऊन तापल्यास हे रोपटे अवघ्या तीन दिवसातच करपेल, असे कृषी तज्ज्ञांसह वयोवृद्ध शेतकºयांकडून सांगण्यात येते.ठिबक सिंचन पद्धत ठरेल फायद्याचीदमदार पाऊस अद्याप वर्धा जिल्ह्यात झाला नसल्याने भूगर्भातील पाणी पातळीतही पाहिजे त्या प्रमाणात वाढ झालेली नाही. ज्यांच्याकडे सिंचनाची व्यवस्था आहे अशा शेतकºयांनी उपलब्ध कमी पाण्यात पीक जगविण्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केल्यास ते फायद्याचे ठरेल, असे सांगण्यात येते.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस