नैसर्गिक पद्धतीने फुलविली भाजीपाला, बागायती शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 06:00 AM2020-01-24T06:00:00+5:302020-01-24T06:00:16+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अल्लीपूर : महागड्या रासायनिक खतांमुळे जमिनीचा पोत घसरतो. याचाच परिणाम उत्पादन आणि उत्पन्नावर होतो.ही बाब लक्षात ...

Naturally flowered vegetables, horticultural farming | नैसर्गिक पद्धतीने फुलविली भाजीपाला, बागायती शेती

नैसर्गिक पद्धतीने फुलविली भाजीपाला, बागायती शेती

googlenewsNext
ठळक मुद्देअल्लीपूरच्या सतीशची यशोगाथा : कमी खर्चात अधिक उत्पन्न; शेतकऱ्यांपुढे निर्माण केला आदर्श

लोकमत न्यूज नेटवर्क
अल्लीपूर : महागड्या रासायनिक खतांमुळे जमिनीचा पोत घसरतो. याचाच परिणाम उत्पादन आणि उत्पन्नावर होतो.ही बाब लक्षात घेत युवा शेतकऱ्याने नैसर्गिक शेतीचा ध्यास घेतला. या माध्यमातून या शेतकऱ्याला वार्षिक अडीच लाखांचे उत्पन्न होत आहे.
सतीश सुरेश जोगे (२८) असे या युवा शेतकऱ्याचे नाव आहे. त्याच्याकडे तीन एकर शेती असून संपूर्ण शेती नैसर्गिक पद्धतीने करतो. जीवामृताचा वापर करून शेतात संत्रा, पपई, कांदा, बन्सी गहू, हळद, मिरची यासोबतच मेथी, पालक, सांभार, वांगी आदी भाजीपाला पिकाचे तो गत दोन वर्षांपासून उत्पादन घेतो. या सर्व लागवडीवर तो कोणत्याही रासायनिक पद्धतीचा वापर व फवारणी न करता नैसर्गिक पद्धतीने व गांडूळ खत वापरून अतिशय कमी खर्चात शेती करीत आहे. नैसर्गिक औषधांच्या बळावरच वार्षिक २ लाख ५० हजार रुपयांचे उत्पन्न घेत असल्याचे सतीश या युवा शेतकºयाने सांगितले. त्याने बी. ए. व कृषीबाबत शिक्षण मुक्त विद्यापीठातून घेतले आहे. अतिशय जिद्द आणि चिकाटीने नैसर्गिक पद्धतीचा अवलंब करून शेती करीत आहे. वर्धा येथे झालेल्या कृषी प्रदर्शनात त्याने जीवामृत पद्धतीने लागवड केलेला भाजीपाला ठेवला होता. त्याचा कृषीविभागाद्वारे सन्मानही करण्यात आला.

Web Title: Naturally flowered vegetables, horticultural farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.