शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
4
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
5
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
7
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
8
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
9
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
10
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
11
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
12
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
13
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
14
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
15
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
16
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
17
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
18
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
19
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
20
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्याची खबरदारी घेत सोमवारी शाळांची घंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 05:00 IST

जिल्ह्यात ९ ते १२ पर्यंतच्या एकूण ३५८ शाळा असून २ हजार २०० शिक्षक तर १ हजार १०० शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहे. शिक्षकांच्या कोविड चाचणीकरिता तालुका स्तरावर ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयात व्यवस्था करण्यात आली आहे. १७ नोव्हेंबरपासून कोविड चाचणी सुरु झाली असून २२ नोव्हेंबरपर्यंत ९ ते १२ वीच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोविड चाचणी करणे बंधनकारक आहे.

ठळक मुद्देशिक्षण विभागाकडून नियोजनाला सुरुवात : शिक्षकांना अ‍ॅन्टिजेन किंवा आरटीपीसीआर चाचणीचा पर्याय

  लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा :  राज्य शासनाने  ‘अनलॉक’ नंतर २३ नोव्हेंबरपासून इयत्ता ९ वी ते १२ वी पर्यंतच्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालय सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आरोग्य विषयक खबरदारी घेण्याचे निर्देश दिले असून शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोविड चाचणी करणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे आता कोविड चाचणी करण्याकरिता शिक्षकांची गर्दी उसळली आहे. जिल्ह्यात ९ ते १२ पर्यंतच्या एकूण ३५८ शाळा असून २ हजार २०० शिक्षक तर १ हजार १०० शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहे. शिक्षकांच्या कोविड चाचणीकरिता तालुका स्तरावर ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयात व्यवस्था करण्यात आली आहे. १७ नोव्हेंबरपासून कोविड चाचणी सुरु झाली असून २२ नोव्हेंबरपर्यंत ९ ते १२ वीच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोविड चाचणी करणे बंधनकारक आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षकांना प्रथम अ‍ॅन्टिजेन आणि आवश्यकता असल्यास आरटीपीसीआर चाचणी करण्याचा पर्याय दिला आहे. या शाळांमध्ये तब्बल ७० हजार विद्यार्थी असून आरोग्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांचे थर्मल स्कॅनिंग केले जाणार आहेत. तसेच शाळांमध्ये शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार उपाययोजना करण्याचे निर्देशही देण्यात आले आहे. शाळांमधील सोयी-सुविधांचा तसेच शाळा व्यवस्थापन समितीचा आढावा शिक्षण विभागाकडून घेतला जात आहे. यासर्व खबरदारी घेऊनच सुरक्षित वातावरणात सोमवारपासून शाळा सुरु    करायच्या आहेत. पालकांनी भीती न बाळगता पाल्यांना शाळेत पाठवावे. सोबतच मुख्याध्यापकांनी सूचनाचे पालन करावे, असे शिक्षणाधिकारी डॅा. मंगेश घोगरे यांनी सांगितले आहे.

तर ऑनलाईन वर्ग घेतला जाणार नाहीशाळा व्यवस्थापन समितीला पालकांकडून संमतीपत्र घ्यावयाचे आहे. जर काही पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यास परवानगी दिली नाही आणि वर्गात ५० टक्केच्यावर विद्यार्थी उपस्थित असल्यास ऑफलाईन वर्ग घेतला जाईल. अनुपस्थित विद्यार्थ्यांकरिता परत ऑनलाईन वर्ग घेतला जाणार नाहीत.

शिक्षकांची चार तास उपस्थिती अनिवार्यशासन निर्णयानुसार शाळेत १०० टक्के शिक्षकांची उपस्थिती अनिवार्य असून कोणता वर्ग ऑनलाईन व कोणता ऑफलाईन घ्यावा, हा निर्णय मुख्याध्यापकाचा राहणार आहे. ऑनलाईन वर्ग घ्यावयाचा असल्यास शिक्षकाला शाळेत येण्याची आवश्यकता राहणार नाही. शाळेत शिक्षकांची कमीत कमी चार तास उपस्थिती अनिवार्य आहे. या कोविड काळात शिक्षकाचे अध्यापन झाल्यानंतर मुख्याध्यापक किंवा शाळा प्रशासनास इतर कामकाज नसल्यास घरी जाता येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात नमूद केले आहे.

 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याSchoolशाळा