शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

मध्यरात्री ‘सायरन’ वाजल्याने धावपळ

By admin | Updated: August 8, 2015 02:21 IST

नजीकच्या हिंगणी येथील कॅनरा बँकेचा सायरन मध्यरात्रीच्या सुमारास अचानक वाजला. यामुळे हिंगणीत एकच खळबळ उडाली.

पोलिसांची तारांबळ : बँकेचा एकही अधिकारी मुख्यालयी नाही सेलू : नजीकच्या हिंगणी येथील कॅनरा बँकेचा सायरन मध्यरात्रीच्या सुमारास अचानक वाजला. यामुळे हिंगणीत एकच खळबळ उडाली. बँकेचा एकही वरिष्ठ अधिकारी वर्धेत राहत नसल्याने सेलू पोलिसांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली. हा सर्व प्रकार गुरुवारी मध्यरात्री २.३० वाजताच्या सुमारास घडली असतानाही नागरिकांचीही गर्दी झाली होती.सविस्तर माहिती अशी की, हिंगणी बसस्थानकाजवळ कॅनरा बँकेची शाखा आहे. गुरुवारी रात्री आपातकालीन सायरन मध्यरात्री वाजण्यास सुरुवात झाली. सायरनचा आवाज कानी पडताच सेलू पोलीस ठाण्याचे रात्र गस्तीवर असलेले पोलीस उपनिरीक्षक मिलिंद रामटेके यांनी लगेच घटनास्थळ गाठले. त्यांना बँकेच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता बँकेचे प्रबंधक गणवीर व संबंधित अधिकारी नागपूरवरुन ये-जा करीत असल्याची माहिती मिळाली. त्याचवेळी उपनिरीक्षक रामटेके यांनी सेलूचे ठाणेदार संतोष बाकल यांना प्रकाराची माहिती दिली. अखेर येथील अस्थायी कामगार सचिन टेकाम हा वानविहिरा येथील असल्याने त्याला घटनास्थळी आणण्यात आले. त्याने बँकेचा दरवाजा उघडून पाहणी केली असता बँकेत कुणीही नसल्याचे दिसून आले. पोलिसांनी शहनिशा करून सायरन कसा वाजला याची चौकशी केली. वाजलेला सायरन आगीची सूचना देणारा असल्याचे समोर आले. मात्र बँकेत कुठेही आग लागली नसल्याचे दिसून आले.(शहर प्रतिनिधी) बँकेचे अधिकारी नसल्याने रहस्य कायमबँकेचे कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने व बँकेच्या सुरक्षेसाठी कुणीही चौकीदार नसल्याने काही अनुचित प्रकार किंवा दरोडा पडल्यास अशा वेळी कोण धावणार, अशा प्रकाराला जबाबदार कोण राहणार, असा प्रश्न हिंगणी येथील नागरिकांसह बँकेचे खातेदारही उपस्थित करीत आहे. या प्रकारामुळे पोलीस प्रशासन बँकेला कोणत्या सूचना देतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. मध्यरात्री मिलिंद रामटेके, चालक शिरोडे व पोलीस शिपाई सुहास मडावी यांनी परिस्थिती हाताळली.शुक्रवारीही बँकेचा कोणताही अधिकारी आला नसल्याने कोणशीही संपर्क झाला नाही. यावरुन बँकेचा भोंगळ कारभार उघड झाला आहे.