शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सहकारी बँकेच्या बारा शाखांचे विलिनीकरण

By admin | Updated: June 15, 2014 23:42 IST

आर्थिक डबघाईस आलेल्या वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला राज्य शासनाच्या निर्णयाने सुखद दिलासा मिळाला आहे. रिजर्व्ह बँकेने लादलेले निर्बंध येत्या एक-दोन दिवसात हटविण्यात येणार असल्याचे शुभसंकेत

बँकेचा निर्णय : ग्रामीण खातेदार दुरावणार अरविंद काकडे - आकोलीआर्थिक डबघाईस आलेल्या वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला राज्य शासनाच्या निर्णयाने सुखद दिलासा मिळाला आहे. रिजर्व्ह बँकेने लादलेले निर्बंध येत्या एक-दोन दिवसात हटविण्यात येणार असल्याचे शुभसंकेत कानावर येत असताना बँकेच्या बारा शाखांचे विलीनीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय ग्रामीण भागातील खातेदारांसाठी धक्कादायक ठरणारा आहे.सहकाराला ग्रामीण भागापर्यंत पोहचावे या हेतूने ग्रामीण भागात बँकेच्या शाखा उघडण्यात आल्या होत्या. विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांमार्फतच शेतकऱ्यांना पतपुरवठा याच शाखांतून होत होता. विजेचे बिल, भरण्याची सुविधा होती. शिक्षकांचे वेतन व ग्रामपंचायतींचे व्यवहारही याच शाखांमधून व्हायचे. त्यामुळे बँकांशी शेतकरी, शेतमजुरांची नाळ घट्ट झाली होती. राज्य शासनाने पॅकेज घोषित केल्यामुळे नव्याने या सुविधांचा लाभ घेता येईल. ही आशा पल्लवीत झाली. असे असताना ग्रामीण भागाशी जुळलेल्या शाखांचे होणारे विलीकरण ग्रामीण खातेदारांत दुरावा निर्माण करणारे आहे.१२ जुलै पासून दिनकरनगर शाखा सेलू शाखेत, ठाणेगाव आणि कन्नमवारग्राम शाखा कारंजा शाखेत, सुतगिरणी शाखा महिला आश्रम वर्धा शाखेत, वायफड शाखा वर्धा शाखेत, मदनी सेवाग्राम शाखेत, कोरा नंदोरी शाखेत, पोहणा शाखा वडनेर शाखेत, तळेगाव(टा.) वायगाव शाखेत, विजयगोपाल शाखा पुलगाव शाखेत, रसुलाबाद शाखा पुलगाव शाखेत आणि पिंपळखुटा शाखा आर्वी शाखेत विलीन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदर शाखांचे कर्मचारी सुद्धा यथावकाश त्या-त्या शाखांमध्ये कर्तव्यावर रूजू होणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचा प्रश्न निर्माण होणार नसल्याने बँकेच्यावतीने सांगण्यात आले आहे. मात्र या बँकेत असलेल्या खातेदारांच्या पैशाकरिता मात्र त्यांना ज्या शाखेत त्यांची बँक विलीन झाली त्या बँकेत जावून पैसे आणण्याकरिता चकरा माराच्या लागणार आहे. बँक विलिनीकरणाचा लाभ बँकेला होत असला तरी त्याचा खरा फटका बँकेतील खातेदांना बसणार असल्याचे वास्तव आहे.