शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

पीक कर्जासाठी प्रथमच मंडळस्तरावर कर्ज मेळावे

By admin | Updated: May 25, 2016 02:16 IST

खरीप पीक कर्जापासून जिल्ह्यातील एकही शेतकरी वंचित राहणार नाही, या दृष्टीने पहिल्यांदाच मंडळस्तरावर पीक कर्ज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

वर्धा : खरीप पीक कर्जापासून जिल्ह्यातील एकही शेतकरी वंचित राहणार नाही, या दृष्टीने पहिल्यांदाच मंडळस्तरावर पीक कर्ज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी (दि.२७) मेळाव्याला शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले.प्रत्येक शेतकऱ्याला कर्ज पुरवठा व्हावा यासाठी महसूल, कृषी व बँकेच्या प्रतिनिधीसमवेत संयुक्त कृषी कर्ज मेळावा मंडळस्तरावर दि. २७ मे, ३ जून व १० जून रोजी आयोजित करण्यात आला आहे. मेळाव्यात कर्जाचे पुनर्गठण करण्यात येणार असून गतवर्षी कर्ज घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांचे कर्ज पुनर्गठण करण्यात येणार आहे. यात मंडळ व गावनिहाय प्रत्येक शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध होईल. यासाठी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. खातेदारांच्या यादीचे काम सुरूवर्धा : तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवक यांच्याकडून गावनिहाय पात्र खातेदारांची यादी तयार करण्यात येत आहे. पात्र खातेदारांपैकी कर्ज न घेतलेल्या खातेदार शेतकऱ्यांना मंडळ स्तरावरील पीक कर्ज मेळाव्यात कर्ज पुरवठा मंजूर करण्यासाठी आवश्यक कार्यवाही पूर्ण करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिल्या. पीक कर्ज मेळाव्यास सर्व संबंधित अधिकारी, बॅकांचे प्रतिनिधी उपस्थित राहतील. पीक कर्ज मेळाव्यात सर्व लोकप्रतिनिधींना सहभागी करून घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शेतकरी खरीप पीक कर्जापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. वर्धा महसूल विभागातील वर्धा तालुक्यांतर्गत वर्धा, आंजी (मोठी), वायफड, सेवाग्राम, वायगाव (नि.), सालोड हिरापूर, तळेगाव (टा.) येथे मेळावा होणार आहे. सेलू तालुक्यांतर्गत सेलू, सिंदी, हिंगणी, झडशी व केळझर येथे तर देवळी तालुक्यातील पुलगाव, भिडी, गिरोली, विजयगोपाल, अंदोरी व देवळी येथे मेळावा होईल. हिंगणघाट विभागात हिंगणघाट तालुक्यातील सावली (वाघ), अल्लीपूर, वडनेर, कानगाव, पोहणा, वाघोली व सिरसगाव तसेच समुद्रपूर तालुक्यातील समुद्रपूर, मांडगाव, गिरड, नंदोरी, कांढळी, कोरा, वायगाव (गोेंड) व जाम येथे मेळावा आहे. आर्वी विभागातील आर्वी तालुक्यात आर्वी, वाठोडा, खरांगणा (मो.), विरूळ (आकाजी), रोहणा, वाढोणा, आष्टी तालुक्यात आष्टी, साहुर, तळेगाव (श्या.पं.) तर कारंजा तालुक्यात कारंजा, कन्नमवारग्राम, सारवाडी व ठाणेगाव येथे मेळावे घेणार आहेत.(कार्यालय प्रतिनिधी)