शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

गळ्यावर चाकूचे वार युवकाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 05:00 IST

बुधवारी सकाळच्या सुमारास रक्ताच्या थारोळ्यात युवकाचा मृतदेह दिसल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. अज्ञात आरोपींविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. किसन गजानन देवतळे (१८, रा. आनंदनगर) असे मृतकाचे नाव आहे.  किसन देवतळे याला अज्ञात मारेकऱ्यांनी आनंदनगर येथून दुचाकीने चितोडा परिसरात असलेल्या पाॅवर हाऊसच्या मागील मोकळ्या मैदानात बोलाविले.

ठळक मुद्देचितोडा परिसरातील घटना : अज्ञातांविरुद्ध ठाण्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : अज्ञात मारेकऱ्यांनी युवकाची हत्या करून मृतदेह चितोडा रस्त्यावरील पाॅवर हाऊसच्या मागील मोकळ्या जागेवर आणून फेकला. ही घटना मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. बुधवारी सकाळच्या सुमारास रक्ताच्या थारोळ्यात युवकाचा मृतदेह दिसल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. अज्ञात आरोपींविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. किसन गजानन देवतळे (१८, रा. आनंदनगर) असे मृतकाचे नाव आहे. किसन देवतळे याला अज्ञात मारेकऱ्यांनी आनंदनगर येथून दुचाकीने चितोडा परिसरात असलेल्या पाॅवर हाऊसच्या मागील मोकळ्या मैदानात बोलाविले. दरम्यान, त्याच्याशी वाद करून त्याच्या गळ्यावर चाकूने सपासप वार केले. इतकेच नव्हे तर किसनच्या डोक्यावर धारदार वस्तूने वार करीत त्याची हत्या करून मृतदेह तेथेच फेकून दिला, असा संशय आहे. बुधवारी सकाळच्या सुमारास रक्तबंबाळ स्थितीत मृतदेह नागरिकांना दिसताच त्यांनी शहर पोलिसांना याची माहिती दिली. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप, ठाणेदार सत्यवीर बंडिवार यांच्यासह वर्धा शहर गुन्हे शोध पथकाच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेत पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविला. घटनास्थळी ठसेतज्ज्ञ, श्वानपथकालादेखील पाचारण करण्यात आले होते. 

दोन आरोपींना एलसीबीने घेतले ताब्यातखून प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेची टीम आरोपींच्या शोधात रवाना झाली होती. रात्री उशीरा या खुन प्रकरणातील दोन आरोपींना एलसीबीने ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस