शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

जागा मिळेपर्यंत ‘जैसे थे’ ठेवा

By admin | Updated: September 29, 2016 00:48 IST

बाजारपेठेसह शहराच्या मुख्य चौकांतील हातगाड्या व अन्य अतिक्रमित दुकाने हटविल्याने किरकोळ भाजी, फळ विक्रेत्यांचा उदरनिर्वाह कठीण झाला.

जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा : हॉकर्स किरकोळ फुटपाथ विक्रेत्यांचे साकडेवर्धा : बाजारपेठेसह शहराच्या मुख्य चौकांतील हातगाड्या व अन्य अतिक्रमित दुकाने हटविल्याने किरकोळ भाजी, फळ विक्रेत्यांचा उदरनिर्वाह कठीण झाला. पर्यायी जागाही मिळाली नसल्याने व्यवसाय बंद आहे. पर्यायी जागा उपलब्ध होईपर्यंत जैसे थे स्थिती ठेवावी, अशी मागणी करण्यात आली. बुधवारी बजाज चौकातून मोर्चा काढून निवासी उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी यांना निवेदन देण्यात आले. शहरातील मुख्य बाजार लाईन, गोल बाजार, अंबिका चौक, बसस्थानक, बजाज चौक, आर्वी नाका, इंगोले, चौक, शिवाजी पुतळा चौक, पत्रावळी चौक येथील फुटपाथवर फळ, भाजी, होजीयरी, चहा, पानठेले, अल्पोपहार, हार-फुल विक्रेते आदींचे व्यवसाय चालतात. या व्यावसायिकांना पालिकेने रस्त्याच्या कडेला बंड्या वा दुकाने लावण्यास मनाई केली आहे. परिणामी, या किरकोळ व्यापाऱ्यांवर बेरोजगारीचे संकट ओढवले आहे. बाजार लाईन परिसरातच जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. या मागणीसाठी बुधवारी बजाज चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शहरातील किरकोळ भाजी, फळ व अन्य विक्रेत्यांनी आपली दुकाने बंद ठेवून मोर्चात सहभाग घेतला. हा मोर्चा न्यायालयाजवळ अडविण्यात आला. यानंतर भास्कर इथापे, विजय आगलावे, रवींद्र शाहु, प्रमोद भोमले, मंगेश शेंडे, हबीब यांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी यांना निवेदन सादर केले. चर्चेत जिल्हाधिकारी व न.प. मुख्याधिकाऱ्यांशी चर्चेनंतर तोडगा काढला जाईल, असे सांगितले.मोर्चामध्ये विनोद वानखेडे, अहमद खा पठाण, प्रवीण कांबळे, इद्रीस खा पठाण, नुर खा पठाण, कांचन खेकडे, रूस्तम, अंतकला नगराळे, अय्याज, सलमान, राजू वैद्य, अनिल जवादे, निजाम, छमू, इमरान, रिजवान कुरेशी, जगदीश शिरभाते, पंढरी खेकडे, मंदा गेडाम मुन्ना बेग, विजू वैद्य, हमिदाबाई, मनोहर निमजे, गुलाब, संदीप सावरकर, कमलेश छकोले, अरविंद वैद्य, अकिल, अर्षद यासह फुटपाथ विक्रेते उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)बाजारातील रस्ते झाले मोकळेशहराच्या बाजारओळीतील अतिक्रमण हटविण्यात आले. यामुळे बाजारपेठेतील रस्ते मोकळे झाले आहेत. कित्येक दिवसांपासून निमूळते झालेले रस्ते मोकळे दिसत आहेत. बाजारातील प्रत्येक दुकानासमोर हातगाड्या, लहान दुकाने लागत असल्याने ती रस्त्यावर येतात. परिणामी, ग्राहक तसेच दुकानदारांना वाहने ठेवण्यासाठीही जागा राहत नाही. यामुळे अतिक्रमण हटविणे गरजेचे होते; पण विक्रेत्यांची व्यवस्था करणेही गरजेचे आहे.उदरनिर्वाहाचा प्रश्न झाला गंभीरशहरातील किरकोळ भाजी, फळ व अन्य वस्तू विक्रेत्यांचे रस्त्याच्या कडेला असलेले अतिक्रमण हटविण्यात आले. यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला आहे. रस्त्याच्या कडेला, बाजारओळीत दुकानांसमोर बसून व्यवसाय करणारे हे नागरिक दररोजच्या मिळकतीवर कुटुंबाचे पालनपोषण करतात. पर्यायी जागा देण्याबाबतचे सर्वेक्षण पालिका प्रशासनाने केले. असे असले तरी या प्रक्रियेला दहा ते बारा दिवसांचा कालावधी लागणार आहे. इतके दिवस दुकान बंद ठेवून हे विक्रेते कुटुंबाचे पालनपोषण करू शकत नाही. यामुळे किरकोळ भाजी, फळ विक्रेत्यांच्या प्रश्नावर त्वरित निर्णय घेणे गरजेचे झाले आहे.