शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अट्टल दुचाकी चोर गजाआड

By admin | Updated: June 10, 2016 02:07 IST

संशयितरित्या दुचाकी चालवित असलेल्या एका युवकाला पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी केली असता तो अट्टल दुचाकीचोर असल्याचे उघड झाले.

सहा दुचाकी जप्त : पुन्हा घटना उजेडात येणारवर्धा : संशयितरित्या दुचाकी चालवित असलेल्या एका युवकाला पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी केली असता तो अट्टल दुचाकीचोर असल्याचे उघड झाले. त्याच्याकडून सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या चोरट्याकडून आणखी दुचाकी जप्त होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सावंगी पोलीस रात्र गस्तीवर असताना धुनिवाले मठ मार्गावर संजय धमाने यांच्या गॅरेज समोर एक इसम संशयितरित्या दुचाकी चालवित असल्याचे दिसून आले. त्याच्या वाहनावरील एम. एच.३२ एन. ९३९९ क्रमांक ट्रेस केला असता तो दुसऱ्या दुचाकीचा असल्याचे समोर आले. त्याला नाव विचारले असता त्याने सोनू उर्फ सनी सदन यादव (२४) रा. आदर्श नगर, सेवाग्राम असे सांगितले. त्याला पोलिसी हिसका दाखविताच त्याने सदर दुचाकी सावंगी रुग्णालयाच्या परिसरातून चोरून आणल्याचे सांगितले. त्याच्या जवळील दुचाकीचा इंजिन व चेचीस क्रमांक तपासला असता या संदर्भात भादंविच्या कलम ३७९ गुन्हा दाखल असल्याचे समोर आले. त्याला विचारणा केली असता त्याच्याकडून इतर दुचाकी मिळून आल्या. त्याने चोरी करून क्रमांक बदलवित विकलेल्या दुचाकी पोलिसांनी जप्त केल्याचे सांगण्यात आले आहे. त्याच्याकडून आणखी दुचाकी मिळण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात आली आहे.ही कारवाई सावंगी पोलीस ठाण्याचे निरीक्षक शेगावकर यांच्या मार्गदर्शनात जमादार रामदास बिसने, विकास अवचट, संघसेन कांबळे, नवनाथ मुंडे यांनी केली.(प्रतिनिधी)