शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
6
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
7
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
8
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
9
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
10
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
11
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
12
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
13
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
14
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
16
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
17
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
18
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
19
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
20
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे

वन्यप्राण्यांचा बंदोबस्त होत नसेल तर मारण्याची परवानगी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2019 5:00 AM

वन्यप्राण्यांमध्ये रानडुकर व रोही यांचे कळप शेतात घुसून पिकांची नासाडी करतात. वनविभागाकडून नुकसान भरपाईच्या नावावर थट्टा केली जाते. एवढेच नव्हेतर रानडुकर, वाघ, बिबट थेट संधी साधून शेतकऱ्यांवर हल्ला करतात. यात अनेकांचे जीव गेले आहे. याबाबत शेतकरी वनविभागाकडे तक्रार करतात, पण, वनविभाग कायद्याची चौकट सांगून नुकसान भरपाई देण्यासही टाळाटाळ करतात.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या संयमाचा भडका : वनविभागाची जाणीवपूर्वक डोळेझाक

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : जंगलव्याप्त परिसरातील शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांची वन्यप्राण्यांकडून नासधूस केली जात आहे. आता या प्राण्याचा वावर थेट सेलू, घोराडपर्यंत आला आहे. शेतकºयांच्या तोंडचा घास एका रात्रीतून हिसकावल्या जात असला तरी वनविभाग हातावर हात ठेवून कायद्याची भाषा बोलतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध फुटला असून वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करा अन्यथा मारण्याची परवानगी द्या, अशी मागणी करीत आहे.वन्यप्राण्यांमध्ये रानडुकर व रोही यांचे कळप शेतात घुसून पिकांची नासाडी करतात. वनविभागाकडून नुकसान भरपाईच्या नावावर थट्टा केली जाते. एवढेच नव्हेतर रानडुकर, वाघ, बिबट थेट संधी साधून शेतकऱ्यांवर हल्ला करतात. यात अनेकांचे जीव गेले आहे. याबाबत शेतकरी वनविभागाकडे तक्रार करतात, पण, वनविभाग कायद्याची चौकट सांगून नुकसान भरपाई देण्यासही टाळाटाळ करतात. शंभर टक्के अनुदानावर शेतकºयांच्या शेताला तारांच्या जाळीचे कुंपन देण्याची शेतकऱ्यांची मागणी धुडकावून लावल्या जाते. वन्यप्राण्यांच्या दहशतीमुळे रात्रीची जागल बंद झाली. मजुर शेतात कामावर येतांना वन्यप्राण्यांची भिती व्यक्त करतात. मात्र; पोटाची खळगी भरण्यासाठी मृत्यू समोर असताना त्यांना काम करण्याशिवाय पर्याय नाही. शेतातीलच काय गोठ्यातील जनावरेही वन्यप्राणी उचलून नेतात. शेतकºयांचा केव्हा जीव जाईल याचा नेम नाही. जनावरांबरोबर मानसांवरीलही हल्ले वाढले आहे. शासनाने शेतकºयांना दिवसभर वीज मिळेल, अशी व्यवस्था करावी. म्हणजे रात्री जीव धोक्यात घालून ओलीत करण्याची वेळ येणार नाही. शेती करण्यासाठी पूर्ण संरक्षण द्यावे अन्यथा शेतकरी स्वत:च वन्यप्राण्याचा बंदोबस्त करेल. त्यासाठी वन्यप्राण्यांना मारण्याची परवानगी द्यावी अशी संतप्त प्रतिक्रिया आता शेतकऱ्यांकडून व्यक्त होऊ लागल्या आहे.

टॅग्स :forestजंगल