शिवकार्याचा इतिहास रक्तरंजीत आहे

By Admin | Updated: June 15, 2014 23:43 IST2014-06-15T23:43:37+5:302014-06-15T23:43:37+5:30

आज जेवढी गरज शिवबाची आहे, त्यापेक्षा जास्त गरज आहे ती शहाजी राजे आणि जिजामाताची! कारण, जोपर्यंत हे घडत नाही, तोपर्यंत शिवाजी घडूच शकत नाही़ आज आपला २५ वर्षांचा तरूण पोरगा काय करीत आहे,

History of Shiva is in the bloodstream | शिवकार्याचा इतिहास रक्तरंजीत आहे

शिवकार्याचा इतिहास रक्तरंजीत आहे

शिवराज्याभिषेक सोहळा : व्याख्याते श्रीनिवास पेंडसे यांचे प्रतिपादन
हिंगणघाट : आज जेवढी गरज शिवबाची आहे, त्यापेक्षा जास्त गरज आहे ती शहाजी राजे आणि जिजामाताची! कारण, जोपर्यंत हे घडत नाही, तोपर्यंत शिवाजी घडूच शकत नाही़ आज आपला २५ वर्षांचा तरूण पोरगा काय करीत आहे, हे देखील आजच्या पित्यांना माहिती नसते़ या उलट शहाजी राजे यांनी शिवबा जेव्हा दीड वर्षांचे होते तेव्हाच हे विधान केले होते की, स्वराज्याचे निर्माण, हिंदुराज्याचे निर्माण माझा शिवबा करेल! असा त्या माता पित्यांचा आपल्या मुलावर असलेला दृढ विश्वास! शिवकार्य हे सोपे कार्य नव्हे व या कार्याचा इतिहास हा रक्तरंजीत इतिहास आहे, असे प्रतिपादन श्रीनिवास पेंडसे रत्नागिरी यांनी केले़
सत्कर्म सामाजिक संस्था हिंगणघाट आणि श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने येथे वर्धा जिल्ह्यात प्रथमच शिवतिर्थावर (शिवाजी पार्कमध्ये) छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले़ यानंतर शिवाजी महाराजांचे जीवन व कामगिरीवर आयोजित व्याख्यानात श्रीनिवास पेंडसे रत्नागिरी बोलत होते़ सोहळ्यात सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला सुधीर पांडे व त्यांच्या चमूद्वारे पारंपरिक पद्धतीने बोकारे दाम्पत्याकरवी अभिषेक करण्यात आला़ या सोहळ्याच्या आयोजनाबद्दल समीर कुणावार यांनी सत्कर्म सामाजिक संस्थेचे आभार मानले़ हे शिवकार्य दरवर्षी या पावन तिर्थावर घडत राहावे, असे सांगितले़ संचालन अमीत म्हैसेकर यांनी केले़ सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी सत्कर्मचे अध्यक्ष आशिष जैन, पदाधिकारी, राजे संघटना, साई मंदिर देवस्थान संस्था, रोशन नागमोते, उमेश बुराडे, रूपेश लाजुरकर, चाफले, खेनवाल, आदींनी सहकार्य केले़(तालुका प्रतिनिधी)

Web Title: History of Shiva is in the bloodstream