शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य सेवा कोलमडली

By admin | Updated: June 4, 2014 23:56 IST

जिल्ह्यातील सर्वच वैद्यकीय अधिकार्‍यांनी संप पुकारल्याने जिल्ह्यातील आरोग्य सेवेचा खेळंबा झाला आहे. या संपात जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य

वर्धा :  जिल्ह्यातील सर्वच वैद्यकीय अधिकार्‍यांनी संप पुकारल्याने जिल्ह्यातील आरोग्य सेवेचा खेळंबा झाला आहे. या संपात जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्वच वैद्यकीय अधिकार्‍यांचा समावेश असल्याने रुग्णांचे हाल होत आहे. महाराष्ट्र राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट-अ ‘मॅग्मो’ संघटनेने आपल्या प्रलंबित मागण्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी यासाठी २ जूनपासून बेमूदत संप पुकारलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी आश्‍वासन देऊनही मागण्यांची पूर्तता केली नसल्याने वैद्यकीय अधिकार्‍यांनी संपाचे हत्यार उपसल्याचे संघटनेचे अधिकारी सांगत आहेत. सन २00९-१0 मध्ये समावेशन झालेल्यांना पूर्ववक्षी प्रभावाने लाभ मिळावा, अस्थाई ७८९ बीएएमस वैद्यकीय अधिकारी व ३२ बीडीएम दंत तज्ज्ञाना कायम करावे १ जानेवारी २00६ पासून वैद्यकीय अधिकार्‍यांना सहावा वेतन अयोग लागू करावा. राज्यातील सर्व वैद्यकीय अधिकार्‍यांना केंद्र शासनाप्रमाणे व वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाप्रमाणे उच्च वेतन मिळावे, पदव्युत्तर वैद्यकीय अधिकार्‍यांना खातेअंतर्गत पदोन्नतीचा मार्ग द्यावा, वैद्यकीय अधिकार्‍यांची ज्येष्ठता यादी तयार करावी, कामाचे तास निश्‍चित करावे. व्यवसायरोध भत्ता ऐच्छीक असावा, पदव्युत्तर अभ्यासक्रमास असणार्‍या वैद्यकीय अधिकार्‍यांना व्यवसायरोध भत्ता मिळावा, वैद्यकीय अधिकार्‍यांना पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी पाठविण्याकरिता आदर्श धोरण ठरविण्यात यावे, वरिष्ठ आरोग्य अधिकार्‍यांना तीन व सहा आगावू वेतनवाढी देण्यात याव्या व सेवानवृत्तीचे वय ६२ करण्यात यावे, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. या मागण्यासाठी वारंवार शासनदरबारी पाठपुरावा करूनही आश्‍वासनाशिवाय संघटनेच्या पदरी काहीही पडले नसल्याचे नाईलाजास्तव संप करावा लागल्याचे संघटनेने सांगितले आहे. रुग्णांची गैरसोय टाळण्याकरिता शासनाच्या प्रतिनिधींनी वैद्यकीय अधिकार्‍यांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करून मार्ग काढण्याची मागणी सर्व स्तरावरुन होत आहे.  ग्रामीण भागातील रुग्णांची हेळसांड होत आहे.(प्रतिनिधी)