शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसेवकाअभावी ग्रा.पं.ची कामे खोळंबली

By admin | Updated: July 29, 2014 23:58 IST

आर्वी तालुक्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या विरूळचा कारभार सध्या रामभरोसे झाला आहे़ येथील ग्रामसेवक गोरे यांची बदली झाली आहे. तात्पुरता कारभार खरांगणा-मोरांगण्याचा ग्रामसेवकाला दिला आहे.

विरूळ (आ़) : आर्वी तालुक्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या विरूळचा कारभार सध्या रामभरोसे झाला आहे़ येथील ग्रामसेवक गोरे यांची बदली झाली आहे. तात्पुरता कारभार खरांगणा-मोरांगण्याचा ग्रामसेवकाला दिला आहे. पण ग्रामसेवक आठवड्यातून तीनच दिवस येत असल्याने विरूळ गावाचा विकास खुुंटला आहे़ त्यामुळे लवकरात लवकर कायमस्वरूपी ग्रामसेवक देण्याची मागणी केली जात आहे़ याबाबत आर्वीचे गटविकास अधिकारी कमालीचे उदासीन असल्याचे दिसते. तालुक्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून या ग्रामपंचायतची ओळख आहे़ या गावात ग्रामपंचायतची निवडणूक न घेता गावकऱ्यांनी अविरोध अकरा सदस्यांची निवड केली आहे़ परंतु पंचायत समितीच्या उदासीन कारभारामुळे गावाला पूर्ण वेळ ग्रामसेवक न भेटणे हे एक दुर्देव असल्याचे ग्रामस्थांमधून तसेच म्हणावे लागेल़ सध्या पावसाचे दिवस सुरू आहे़ अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे़ गावालगतच रस्त्यावर लोकांनी शेणाचे ढिगारे ठेवले असल्याने आरोग्यास धोका निर्माण झाला आहे़ पिण्याच्या पाण्यात वेळेवर ब्लिचिंग पावडर टाकल्या जाते की नाही याकडे सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे़ गावात नियमित ग्रामसचिव नसल्याने मोठ्या प्रमाणात समस्या वाढत आहे़ या समस्येमुळे नागरिकही त्रस्त आहे़ गावात कोणता शासकीय फंड येतो याची कल्पना सुद्धा गावकऱ्यांना राहत नाही़ गावकऱ्यांची खोलंबलेली कामे लक्षात घेत आर्वीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांची ही मागणी लक्षात घेता कायमस्वरूपी ग्रामसेवक देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे़(वार्ताहर)