वाहनासह ८ लाख ५३ हजारांचा विदेशी दारूसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 05:00 IST2020-03-05T05:00:00+5:302020-03-05T05:00:22+5:30

यवतमाळ जिल्ह्यातून वर्ध्यात दारू आणत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीसांनी नाकाबंदी केली असता एम.एच.३२ ए.एच.६४९५ क्रमांकाची चारचाकी भरधाव येताना दिसली. पोलिसांनी कारचालकास हात देत कार थांबविली. पोलिसांना पाहताच कारमधील मोनू नामक युवकाने तेथून पळ काढला. तर बादल शिवचरण साहू (२७) यास अटक केली. तर मोनू नामक दारूविक्रेत्याचा शोध पोलीस घेत आहे.

Foreign liquor seized of Rs 8 Lakhs 53 Thousand | वाहनासह ८ लाख ५३ हजारांचा विदेशी दारूसाठा जप्त

वाहनासह ८ लाख ५३ हजारांचा विदेशी दारूसाठा जप्त

ठळक मुद्देएकास अटक : होळीच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शोध पथकाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : यवतमाळ जिल्ह्यातून वर्ध्यात दारूसाठा आणत असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी नाकाबंदी करीत वाहनासह ८ लाख ५३ हजार ६०० रुपयांचा दारूसाठा जप्त करीत एकास अटक करण्यात आली. तर एक जण फरार होण्यात यशस्वी झाला.
होळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. वर्धा जिल्हा दारूबंदी जिल्हा असल्याने कोटी रुपयांच्या दारूची उलाढाल याच जिल्ह्यात होते. शहरात दारूविक्रीने कळस गाठला असून होळी सणानिमित्त वर्ध्यात दाखल होणारा दारूसाठा शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने छापा घालून जप्त केला.
यवतमाळ जिल्ह्यातून वर्ध्यात दारू आणत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीसांनी नाकाबंदी केली असता एम.एच.३२ ए.एच.६४९५ क्रमांकाची चारचाकी भरधाव येताना दिसली. पोलिसांनी कारचालकास हात देत कार थांबविली. पोलिसांना पाहताच कारमधील मोनू नामक युवकाने तेथून पळ काढला. तर बादल शिवचरण साहू (२७) यास अटक केली. तर मोनू नामक दारूविक्रेत्याचा शोध पोलीस घेत आहे.
पोलिसांनी कारची पाहणी केली असता कारमध्ये विदेशी दारूसाठा आढळून आला. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी पीयुष जगताप, ठाणेदार धनाजी जळक यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकाचे विवेक लोणकर, दिवाकर परिमल, पवन निलेकर, अरविंद घुगे, सचिन दीक्षित, आनंद भस्मे, अमर लाखे यांनी केली.

सर्रास सुरू आहे दारूविक्री
शहरातील संत तुकाराम वॉर्ड, इतवारा, शास्त्री चौक परिसर, रामनगर, आर्वी नाका, पावडे चौक, रेल्वेस्थानक परिसर आदी ठिकाणी सर्रास दारूविक्री सुरू आहे. मात्र, अर्थकारणामुळे पोलिसांकडून कारवाई नाही. दारूविक्रेत्यांच्या मुसक्या आवळण्याची मागणी होत आहे.

Web Title: Foreign liquor seized of Rs 8 Lakhs 53 Thousand

टॅग्स :Policeपोलिस