शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आंबलेले दूध माणसाच्या सर्व आजारांवर लाभदायक

By admin | Updated: November 1, 2014 23:12 IST

देशी गाईचे कच्चे व आंबलेले दूध हे मनुष्याच्या आरोग्याचे रक्षण कवच आहे. कच्चे व आमलेले दूध सेवन केल्याने मनुष्य विविध आजारापासून मुक्त राहू शकतो. लॅक्टीक अ‍ॅसिडचे प्रमाणही देशी

वर्धा : देशी गाईचे कच्चे व आंबलेले दूध हे मनुष्याच्या आरोग्याचे रक्षण कवच आहे. कच्चे व आमलेले दूध सेवन केल्याने मनुष्य विविध आजारापासून मुक्त राहू शकतो. लॅक्टीक अ‍ॅसिडचे प्रमाणही देशी गायीच्या दुधात मोठ्या प्रमाणात असल्याने माणसाच्या संपूर्ण आरोग्यास लाभदायक आहे, असे प्रतिपादन पुणे येथील मेडिकल कॉलेज व प्रिव्हेंटीव्ह सोशल मेडिसीनचे विशेषज्ज्ञ प्रा.डॉ. अशोक काळे यांनी केले़जय महाकाली शिक्षण संस्था व अखिल भारतीय कृषी गो-सेवा संघ गोपूरी यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी अग्निहोत्री कॉलेजच्या पेंटागॉन सभागृहात गोपाष्टमी महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते़ गोमातेचे पूजन करून कार्यक्रमास प्रारंभ झाला़ डॉ. अशोक काळे यांनी पॉवर पॉर्इंट प्रेझंटेशनद्वारे वैज्ञानिक माहिती देताना भारतीय मूळ वंशाच्या आणि विदेशी वंशाच्या जातीच्या गायींच्या दुधातील संशोधात्मक बाबी स्पष्ट केल्या. यात ‘ए वन’ ही विदेशी वंशाची गाय व ‘ए टू’ ही देशी गाय. संधोधनाच्या आधारे देशी गायीच्या दुधातच मोठ्या प्रमाणात माणसाच्या आरोग्यास लाभादायक तत्वाचे प्रमाण असल्याचे दिसून आले. मधुमेह, रक्तदाब सारख्या आजारासाठी देशी गायीचे कच्चे दूध वा आमले दूध दैनंदिन सेवन केल्याने फायदेशीर ठरतात, असे ते म्हणाले. कोलेस्टेरॉलच्या भीतीमुळे दूध पिण्याचे प्रमाण कमी झाल्याने डेयरी विभागात दुधाची पावडर पडून आहे. दुधाच्या पावडरला जगात किंमत मिळत नाही; पण अ‍ॅलोपॅथी संशोधनातून देशी गाईचे कच्चे दूध व आंबले दूध हे आरोग्यासाठी लाभदायक आहे, हे सिद्ध केले आहे़ माणसाचे जीवन सुदृढ ठेवण्यासाठी गायींना जिवंत ठेवले पाहिजे, असे आवाहनही डॉ. काळे यांनी केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शंकरप्रसाद अग्निहोत्री तर अतिथी म्हणून नंदू गावंडे, दिलीप बजाज आदी उपस्थित होते. अग्निहोत्री यांनी आमची भूमी ही ऋषी-मुनींची आहे़ त्या काळापासून गाईंना पवित्र मानले जाते. भारतीय संस्कृतीत पाच प्रकारच्या कामधेनू होत्या. त्यात नंदा गाय ही जमदग्नी ऋषीजवळ होती. जी अहंकार नष्टचे प्रतिक आहे. भारद्वाज मुनीजवळ सुभद्रा कामधेनू होती जी खगोलशास्त्राची प्रतीक होती. वशिष्ठ ऋषीजवळ सुरभी कामधेनू होती. ती शक्तीची प्रतीक होती. बहुनी कामधेनू ही गौतम ऋषीजवळ होती. ती ज्ञानाचे, धर्मशास्त्राचे प्रतीक मानली गेली आहे. सुशीला कामधेनू ही असितमूनी जवळ होती. ती भविष्य व अर्थाचे प्रतीक मानली जाते, असे सांगितले़ गावंडे यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक गो-सेवा संघाचे मंत्री मुलचंद बडजाते यांनी केले. गोसेवकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संचालन डॉ. श्रीकांत घरोटे यांनी केले तर आभार मनोहर पंचारिया यांनी मानले. यावेळी आशिष गोस्वामी, प्राचार्य धर्मेंद्र मुंधडा, प्रमोद गिरडकर, अरुण वसू, संजीव लाभे, गजेंद्र सुरकार आदी उपस्थित होते़(कार्यालय प्रतिनिधी)