शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

गणरायाच्या आगमनाचा उत्साह

By admin | Updated: September 15, 2015 04:54 IST

अवघ्या महाराष्ट्राचे लाडके दैवत असलेल्या गणरायाचे आगमन गुरुवारी जिल्ह्यात सर्वात्र होत आहे. गणपती ही बुद्धीची

वर्धा : अवघ्या महाराष्ट्राचे लाडके दैवत असलेल्या गणरायाचे आगमन गुरुवारी जिल्ह्यात सर्वात्र होत आहे. गणपती ही बुद्धीची देवता. जेवढी ती मोठ्यांसाठी श्रद्धस्थ तितकीच लहानांनाही प्रिय. म्हणूनच लहान मुले माय फ्रेंड गणेशा घरी येणार या आनंदानेच हरखून गेली आहे. प्रत्येकाला हा सण सेलिब्रेट करायचा असतो. त्यामुळे शहरातील बाजारही सजावटीच्या वस्तूंनी सजला आहे. महागाईची कडवट किनार त्याला असली तरी जल्लोषात कुठेही ती जाणवत नाही. गणपती म्हटलं की सर्वप्रथम त्याची पूजा किंवा त्याची आराधना कशी करायची हा प्रश्न न पडता गणेशाची सजावट कशी करायची हाच विचार येतो. मित्रांसाठी तो सखा असतो तर मोठ्यांसाठी आराध्य. आपल्या घरची सजावट सर्वात वेगळी असावी हा ज्याचा त्याचा प्रयत्न असतो. प्लास्टिकची विविधरंगी फुले, माळा, गणपतीची वस्त्रे, दागिने, ओढण्या अशा सर्वांची सरमिसळ करून गणेशाला विराजमान करण्याच्या जागेची सजावट केली जाते. यातील पारंपरिकता बाहुतांशी कमी झाली असली तरी श्रद्धेला मॉडर्न टच दिसत आहे.(शहर प्रतिनिधी)थर्माकॉलच्या ग्राफिकल डिझाईन४सगळी सजावट केली तरी गणपतीला कुठे विराजमान करायचे हा प्रश्न असतोच. त्यासाठी सर्वात साधा आणि सर्वोत्तम मार्ग म्हणजे थर्माकॉलची घरे. शहरात ग्राफिकल नक्षिकाम असलेली घरे यंदा उपलब्ध आहेत. यातील काही घरे स्थानिक कारागीर बनवित असली तरी राजस्थानी पद्धतीची राजवाड्याची डिझाईन असलेली घरे नागपूरवरून मागविण्यात येतात. आधी ही घरे पातळ थर्माकॉलच्या सहाय्याने बनविल्याने ती टिकत नव्हती. आता मात्र जाड थर्माकॉलची घरे विक्रीस दिसतात. किमान दोन ते तीन वर्ष तरी ती टिकतात. ३०० रुपयांपासून तर १५०० रुपयांपर्यंत ही घरे विक्रीस असल्याचे स्थानिक विक्रेते सांगतात. मक्याच्या कणसाची मागणी वाढली ४गौरी, गणपती हरतालिका अशा सणाच्या काळात मक्याच्या कणसांची मोठी मागणी असते. पावसाअभावी महिनाभरापूर्वी मक्याची मागणी घसरली असली तरी सणांची चाहूल लागतात मक्याची मागणी वाढली आहे. त्याचबरोबर मक्याची कणसे सध्या स्वस्त असल्याचेही दिसून येत आहे. बाजारात दहा रुपयांत मक्याची कणसे विक्रीस उपलब्ध आहे. या काळात मक्याचे सेवन करणे शरिरारासाठी अतिशय पौष्टिक असते. मोदकाचे साचे विक्रीला४गणेशोत्सवात मोदकाला अनन्यसाधारण महत्त्व असते. गणेशाला सर्वप्रथम मोदकाचाच नैवेद्य दाखविला जातो. वेगवेगळ्या प्रकारचे मोदकाचे साचे विक्रीस असून पारंपरिक मोदकांबरोबरच वेगळे मोदकही बनविले जातात. फुलांच्या झाडांची मागणी तेजीत४ईको फ्रेंडली गणेशोत्सवाची आवड असणारे अनेक जण गणपतीच्या सभोवाताल फुलांच्या कुंड्या ठेवण्यावर भर देतात. पण झाडांना या काळात फुले असतीलच असे नसते. त्यामुळे फुले लागून असलेली झाडेच विकत घेण्यावर जास्त भर असतो. या कारणाने शहरातील नर्सरींमध्ये अशा फुलांच्या झाडांची मागणी वाढली आहे. यात सजावटीच्या फुलांची मागणी जास्त असल्याचे दिसते. ईकोफ्रेंडली गणेशोत्सव दूरच ४कुठलाही सण साजरा करताना आपण निसर्गाचे सर्वाधिक दोहन करीत असतो. शाडूच्या मूर्ती बनविताना त्यात काही प्रमाणात प्लास्टर आॅफ पॅरिसचा उपयोग केला जातो. तसेच रंगांमध्येही रसायनांचा वापर केला जातो. यामुळे पाणी दूषित होते. घरच्या घरी एका बादलीत गणेशाचे विसर्जन करावे असे आवाहन शासनाद्वारे केले जाते. पण त्याचा अवलंब होताना दिसत नाही. व्हॉटस अ‍ॅपवर गणेशोत्सवाचा जल्लोष ४सर्वाच्या हृदयात सध्या कुणी स्थान घेतले असेल असा प्रश्न विचारला तर त्याचे एकमुखी उत्तर असेल व्हॉट्स अ‍ॅप. प्रत्येक सण व्हॉट्स अ‍ॅपवर साजरा करण्याचा चंगच तरुणांनी बांधला आहे. आतापासूनच बाप्पा मोरया, जय गणराय अशी विविध नावे आपल्या ग्रूपला दिली जात आहे. बहुतेक जण आपल्या आयकॉनवर गणपतीचे चित्र ठेवत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे व्हॉट्स अ‍ॅप वर गणपतीचा जल्लोष आतापासूनच सुरू झाला आहे.निरनिराळी अ‍ॅपही यासाठी तयार करण्यात आली आहे. शाळांमध्येही जल्लोषाचे वातावरण४जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये गणपतीची स्थापना केली जाते. यासाठी मुलेही आनंदून असतात. सर्व तयारी मुलांकडून करून घेतली जाते. मुलेही आनंदाने यात सहभागी होतात. यात बरेचदा पर्यावरण बचाव असा संदेश देणारे देखावे तयार केले जातात. या काळात शाळांमध्ये विविध उपक्रम आणि स्पर्धाही घेतल्या जातात. मंडळांच्या गणेशाची तयारी सुरू४जिल्ह्यात मंडळाच्या गणेशाची तितकीशी धूम नसली तरी कमी अधिक प्रमाणात सार्वजनिक गणेशाची स्थापना केली जाते. शंभरावर गावांमध्ये एक गाव एक गणपतीची स्थापना केली जातो. यासाठी पेंडॉल उभारण्याचे काम सुरू आहे. बहुतांश गणपती झाले बुक४जिल्ह्यात गणपती उत्सवात कोट्यवधीची उलाढाल असते. सार्वजनिक गणपतीचे तितके प्रस्थ नसले तरी घरोघरी शाडूच्या मातीच्या गणपतीची स्थापना केली जाते. चांगल्या रंगांचे व आकर्षक बनावटीचे गणपती घेण्यासाठी बहुतेक जण शहरात येतात. आयत्या वेळी मनासारखा गणपती मिळत नसल्याने जो तो आधीच गणपती बघून तो बुक करून ठेवत आहे. ४शहरातील बहुुतेक मुख्य कारागिरांच्या घरी गणपती रंगविण्याची तयारी पहावयास गेल्यावर गणपतीच्या डोक्यावर बुक झाल्याची चिठ्ठी नजरेस पडते. सर्वत्र कारागीर मूर्तींना अखेरचा हात मारताना दिसत आहे. अनेकदा नावात घोळ झाल्यामुळे गणपतींची सरमिसळ होते. त्यामुळे एकाचा गणपती अन्य कुणाला दिल्याचे प्रकारही घडत असतात. असे होऊ नये यासाठीच कारागीर जास्त काळजी घेत आहेत. बाहेरूनही अनेक गणपती विक्रेते शहरात गणपती विक्रीसाठी घेऊन आले आहे.