शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
4
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
5
"माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
6
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
7
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
8
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
9
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
10
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
11
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
12
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
13
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
14
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
15
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
16
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
17
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
18
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
19
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
20
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

लहानुजी महाराज मंदिराची दानपेटी फोडली

By admin | Updated: January 4, 2016 04:20 IST

श्रीक्षेत्र टाकरखेड येथील लहानुजी महाराज समाधी मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी फोडून जवळपास चार लाखांची रोख

आर्वी : श्रीक्षेत्र टाकरखेड येथील लहानुजी महाराज समाधी मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी फोडून जवळपास चार लाखांची रोख लंपास केली. ही घटना रविवारी उघड झाली. या घटनेतील चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. पोलीस सुत्रानुसार, नित्याप्रमाणे पहाटेच्या सुमारास पहाटे पुजारी नितीन भालतडक पुजा करायला आले असता त्यांना हा प्रकार दिसला. लगेच त्यांनी चौकीदार व इतरांना या प्रकरणाची माहिती देत पोलिसांना कळविले. ठाणेदार शैलेश साळवी यांच्यासह वर्धा येथील ठसे तज्ज्ञ, गुन्हे अन्वेशन विभाग व श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहणी करताना मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पाहणी केली. यात चोरटे पांढरा ड्रेस घालून चेहऱ्याला बांधून मागच्या दाराची साखळी तोडून समाधी मंदिरात घुसल्याचे दिसले. त्यांनी प्रथम महाराजाच्या पादुका उचलल्या, त्या चांदीच्या असल्याने त्यांनी तश्याच ठेवून दिल्याचे दिसले. त्यानंतर दोघांनी दानपेटी उचलली. सभा मंडपाच्या बाहेर नेऊन फोडली व पोबारा केला. आतमध्ये प्रवेश करताना यास चोरट्यांनी बाहेरिल सीसीटीव्ही कॅमेरा फोडल्याचेही दिसून आले. या घटनेची नोंद करण्यात आली असून तपास सुरू आहे.(तालुका प्रतिनिधी)तुरीच्या ५० पेट्या पळविल्या४वर्धा- विजयगोपाल शिवारातून अज्ञात चोरट्याने रात्रीच्या सुमारास तुरीच्या ५० पेट्या लंपास केल्या. ही घटना रविवारी उघडकीस आली. याबाबत शेतकरी बंडूजी भांगे यांनी पुलगाव पोलिसात तक्रार दाखल केली. त्यांनी स्वत:च्या शेतात तूरीच्या पेट्या बांधून ठेवल्या होत्या. दरम्यान चोरट्यांनी त्या लंपास केल्या. यात त्यांचे अंदाजे पाच हजार रुपयांचे नुकसान झाले. याप्रकरणी कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला.