शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

महिला सक्षमीकरणासाठी विकासात्मक धोरण

By admin | Updated: June 20, 2016 01:56 IST

केंद्र सरकारने सर्वसामान्यांसह महिलांच्या विकासासाठी अनेक योजना सुरू केल्या आहे. महिलांना आणखी बळ देऊन त्यांना अधिक सक्षम करण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे.

पंकज भोयर : विकास पर्वानिमित्त महिला मेळावावर्धा : केंद्र सरकारने सर्वसामान्यांसह महिलांच्या विकासासाठी अनेक योजना सुरू केल्या आहे. महिलांना आणखी बळ देऊन त्यांना अधिक सक्षम करण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे. महिला सक्षमीकरणासाठी आवश्यक असलेले विकासात्मक धोरण राबवीत असल्याचे मत, आमदार डॉ. पंकज भोयर यांनी व्यक्त केले. सेलू येथील महिला मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्याचे उद्घाटन खा. रामदास तडस यांनी केले. अध्यक्षस्थानी आ. डॉ. पंकज भोयर होते तर प्रमुख अतिथी म्हणून पं.स. सभापती मंजुषा दुधबडे, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या ललिता दारोकार, पं.स. सदस्य अशोक कलोडे, प्रफुल्ल गणवीर, भाजपा तालुका सरचिटणीस संजय अवचट, भाजपा महिला आघाडी प्रमुख सारिका देवतारे, राजेश झाडे, संतोष वांदीले, बचत गटाच्या समन्वयक नलू गौळकार, हेमंत नाईकवाडे, सदानंद वानखेडे, टाकळीचे सरपंच रवी बेसेकर वडगाव (खुर्द) चे सरपंच भांडेकर, वडगाव (कला) चे सरपंच छाया दुर्गे, भाजपाच्या तालुका चिटणीस खोडके, तालुका सचिव गहरोले, रोहिणी चिचखेडे आदी मान्यवर उपस्थित होते.स्वातंत्र्यानंतरही महिलांचा हवा तसा विकास झाला नाही. गेल्या दोन वर्षात केंद्र सरकारने महिलांच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण योजना सुरू केल्या आहे. या योजनांची माहिती महिलांपर्यंत पोहचविण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन केले असल्याची माहिती आ. भोयर यांनी दिली. ग्रामीण भागातील महिलांना शेतीच्या माध्यमातून रोजगार मिळतो. परंतु हा रोजगार कायमस्वरूपी नसतो. त्यामुळे महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून शेतीपुरक व्यवसाय सुरू करणे आवश्यक आहे. यासाठी आवश्यक सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही आ. भोयर यांनी यावेळी दिली. यानंतर मानयवरांनी विचार व्यक्त केले. मेळाव्याला परिसरातील महिला उपस्थित होत्या.(स्थानिक प्रतिनिधी)