शहरं
Join us  
Trending Stories
1
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
2
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
3
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
4
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
5
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
6
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
7
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
8
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
9
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
10
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
11
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
12
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
13
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
14
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
15
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
16
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
17
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
18
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

कारला येथील ३० एकरावरील घरे हटविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 06:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : पालकमंत्र्यांच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेऊन वर्धा वनपरिक्षेत्रातील कारला येथील ३० एकर झुडपी जंगलातील अतिक्रमण काढण्यासाठी ...

ठळक मुद्देअतिक्रमण काढण्याचा काऊंटडाऊन : वनविभागाने कसली कंबर

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पालकमंत्र्यांच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेऊन वर्धा वनपरिक्षेत्रातील कारला येथील ३० एकर झुडपी जंगलातील अतिक्रमण काढण्यासाठी वनविभागाने कंबर कसली आहे. त्यासाठीची कागदोपत्री कार्यवाही सध्या युद्धपातळीवर केली जात असून येत्या काही दिवसात वनविभागाच्या सदर ३० एकर जागेवरील घरे पोलीस बंदोबस्तात हटविली जाणार असल्याचे खात्रीदायक सूत्रांनी सांगितले.काही लोकप्रतिनीधींच्या वरद हस्ताने वनविभागाच्या या झुडपी जंगल जागेवर झपाट्याने नागरिकांनी अतिक्रमण केले. परंतु, ते वेळीच काढण्याकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत होते. कुठल्याही परिस्थिती वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण होता कामा नये अशा सूचना जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्र्यांनी दिल्यात. त्यानंतर कुंभकर्णी झापेचे सोंग घेणारा वनविभाग खडबडून जागा झाला आहे. विशेष म्हणजे या भागातील अतिक्रमण धारकांना यापूर्वी वनविभागाच्यावतीने नोटीस बजावण्यात आले आहेत.परंतु, त्यानंतर कारवाई थंडबस्त्यात पडली होती. पालकमंत्र्यांकडून सूचना प्राप्त होताच वनविभागाने पुन्हा एकदा नव्या जोमाने अतिक्रमण काढण्यासाठी कंबर कसली आहे.परस्पर झाले खरेदी-विक्रीचे व्यवहार?वनविभागाच्या जागेवर मनमर्जीने अतिक्रमण करून पक्के घर बांधण्यात आली. इतकेच नव्हे तर काही राजकीय पुढाऱ्यांच्या आशीर्वादाने काही अतिक्रमण धारकांनी सदर जागेचा खरेदी-विक्रीचा व्यवहार केल्याचेही वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या चौकशीत पुढे आले आहेत. परंतु, परस्पर खरेदी-विक्रीचा व्यवहार करणाºयांवर वनविभाग काय कारवाई करणार याबाबत सध्या मोठी गुप्तता बाळगली जात आहे.५८ च्यावर व्यक्तींचे अतिक्रमणवर्धा शहराशेजारी असलेल्या मौजा कारला येथील सर्वे क्रमांक ९८ आराजी ३.६४ हेक्टर, सर्व क्रमांक ९९ आराजी ७.९२ हेक्टर व ०.७२ हेक्टर ही जागा महसूल विभागाने काही वर्षांपूर्वी वनविभागाकडे वळती केली होती. त्याची नोंदही महसूल विभागाने घेतली आहे. परंतु, याच जागेवर सध्या तब्बल ५८ च्यावर व्यक्तींनी अतिक्रमण करून पक्के घर बांधली आहेत. हेच अतिक्रमण वनविभाग आता काढणार आहे.

टॅग्स :sandवाळू