शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

टिप्परच्या धडकेत सायकलस्वार गंभीर

By admin | Updated: September 25, 2015 02:40 IST

आजनगाव येथून दहेगावकडे सायकलने जात असताना भरधाव टिप्परने दिलेल्या धडकेत मधुकर सुखाजी बावणे (६५) रा. दहेगाव हे गंभीर जखमी झाले.

चालक पसार : गुन्हा दाखलसेलू : आजनगाव येथून दहेगावकडे सायकलने जात असताना भरधाव टिप्परने दिलेल्या धडकेत मधुकर सुखाजी बावणे (६५) रा. दहेगाव हे गंभीर जखमी झाले. हा अपघात मंगळवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास आजनगाव-दहेगाव मार्गावर झाला. प्राप्त माहितीनुसार, बावणे सायकलने गावाकडे येत असताना टिप्परने धडक दिली. या जबर धडकेत सायकलस्वार टिप्परच्या मागील चाकात आल्यामुळे गंभीर जखमी झाले. या घटनेची नोंद दहेगाव (गो.) पोलिसात करण्यात आली असून टिप्पर चालकावर कलम २७९, ३३७, ३३८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.(तालुका प्रतिनिधी) इसमावर शस्त्राने हल्लावर्धा- पत्नीच्या अंगावर खरकटे पाणी का फेकले अशी विचारणा करण्यावरून दादाराव काळे (६२) रा. बेढोणा यांना धारदार शस्त्राने मारहाण करून जखमी केले. ही घटना बेढोणा येथे गुरूवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. प्राप्त माहितीनुसार, दादाराव काळे यांच्या पत्नीच्या अंगावर शेजारी राहणाऱ्या लीलावती काळे हिने पाणी उडविले. यावरून लीलावतीने वाद उपस्थितीत केला. याबाबत विचारणा करण्यासाठी दादाराव गेले असता त्यांचासोबत वाद उपस्थित करून धारदार शस्त्राने मारहाण केली. याबाबत आर्वी पोलिसांनी काळे यांच्या तक्रारीवरून लीलावती काळे विरुद्ध भादंविच्या कलम ३२४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. वादात मध्यस्थी करणे भोवलेवर्धा- पती-पत्नीचा वाद सुरू असताना मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या नंदेश्वर चौधरी (६५) यांना जावयाने मारहाण करून जखमी केले. ही घटना आंजी शिवारात सकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. याबाबत आशा आलोडे यांनी देवळी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून प्रल्हाद आलोडे याच्यावर भादंविच्या कलम ३२३, ३२४ अन्वये गुन्हा दाखल केला. प्रल्हाद व आशा या पती-पत्नीत घरगुती कारणावरून वाद झाला. प्रल्हादने आशाला मारहाण करीत असल्याचे पाहुन आशाचे वडील नंदेश्वर चौधरी यांनी हा वाद सोडविण्यासाठी मध्यस्थी केली असता जावयाने त्यांच्यावर हल्ला केला.