शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

तहसीलदारांना दिले कपाशीचे झाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 06:00 IST

यंदाच्या खरीप हंगामातील जून महिन्यात सरासरीच्या ४० टक्के पाऊस झाला. त्यामुळे पेरणीस उशीर झाली. प्रत्यक्षात जुलैच्या पहिल्या व दुसºया आठवड्यात पेरणीस सुरुवात झाली. तालुक्यात जुलै ते आक्टोबरमध्ये सरासरी पर्जन्यमानापेक्षा अधिक पाऊस झाला आहे. यावर्षी पावसाला उशीरा सुरुवात झाली तसेच पीक वाढीच्या कालावधीत सतत पाऊस व ढगाळ वातावरण राहिल्याने किड व रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांचे आंदोलन : ओला दुष्काळ जाहीर करा

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घा.) : कारंजा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने शासकीय मदत देण्यात यावी, या मागणीसाठी शुक्रवारी तहसीलदारांना घेराव घालण्यात आला. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी विविध मागण्यांचे निवेदन व कपाशीचे झाड तहसीलदार सचिन कुमावत यांना दिले.यंदाच्या खरीप हंगामातील जून महिन्यात सरासरीच्या ४० टक्के पाऊस झाला. त्यामुळे पेरणीस उशीर झाली. प्रत्यक्षात जुलैच्या पहिल्या व दुसºया आठवड्यात पेरणीस सुरुवात झाली. तालुक्यात जुलै ते आक्टोबरमध्ये सरासरी पर्जन्यमानापेक्षा अधिक पाऊस झाला आहे. यावर्षी पावसाला उशीरा सुरुवात झाली तसेच पीक वाढीच्या कालावधीत सतत पाऊस व ढगाळ वातावरण राहिल्याने किड व रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तसेच जमिनीची योग्य मशागत न झाल्याने पिकांचीही वाढ खुंटत फुल व फळधारणा कमी झाली आहे. अशातच परतीच्या पावसाने तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. परंतु, अद्यापही शासनाकडून भरीव शासकीय मदत जाहीर झालेली नाही. ढगाळी वातावरण व पाऊस यामुळे सोयाबीन उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. इतकेच नव्हे तर फळ शेती करणाऱ्यांचेही नुकसान झाले आहे. सध्या कपाशीचे बोंड सडत असून उत्पादनात घट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सदर परिस्थिती लक्षात घेता सर्व शेतकºयांना प्रति हेक्टर सरसकट २५ हजार रुपये मदत जाहीर करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना आ. दादाराव केचे, मंगेश खवशी, उपसभापती रंजना टिपले, जि. पं. सदस्य श्वेता धोटे, सरीता गाखरे, सुरेश खवशी, सभापती निता गजाम यांच्यासह शेतकºयांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.कपाशीवर लाल्या अन् बोंडअळीचाही प्रादुर्भावपरतीच्या पावसामुळे कपाशी पिकाचे बऱ्यापैकी नुकसान झाले आहे. ऑक्टोबर महिन्यात अखेरीस झालेल्या परतीच्या पावसानंतरही जिल्ह्यात ढगाळी वातावरण कायम राहिल्याने सध्या गुलाबी बोंडअळी तसेच लाल्याचा प्रादुर्भाव कपाशी पिकावर दिसून येत असल्याचेही आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :TahasildarतहसीलदारFarmerशेतकरी