कोराेना नियंत्रणासाठी लाॅकडाऊन सोबत जिल्हाबंदीही करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 05:00 AM2021-02-28T05:00:00+5:302021-02-28T05:00:00+5:30

१५ फेब्रुवारी पासून रूग्णसंख्या झपाट्यांने वाढत आहे. जिल्ह्यात २७ हाॅटस्पाॅट असून त्या ठिकाणी कन्टेनन्मेट झोन तयार करून त्या क्षेत्रात नियमाची काटेकाेर अंमलबजावणी करण्याच्या सुचना पालकमंत्र्यांनी दिल्या. तसेच ५० पेक्षा अधिक लोकांनी गर्दी केल्यास लग्न आयोजक व मंगल कार्यालय मालक या दोघांवर दंडात्मक कारवाई करण्यासोबत मंगल कार्यालय सील करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

Correa will also have a district along with a lockdown for control | कोराेना नियंत्रणासाठी लाॅकडाऊन सोबत जिल्हाबंदीही करणार

कोराेना नियंत्रणासाठी लाॅकडाऊन सोबत जिल्हाबंदीही करणार

googlenewsNext
ठळक मुद्देपालकमंत्र्यांचे सुतोवाच : १५ फेब्रुवारीनंतर रूग्णसंख्या वाढल्याने प्रशासन अलर्ट

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : गेल्यावेळी कोरोना संसर्गाच्या काळात नागरिकांनी शिस्त व सयंमाचे पालन केले होते व कोरोना रूग्णवाढीचा दर नियंत्रणात ठेवला होता. आता परिस्थिती बदललेली असून ती नियंत्रणात न आल्यास लाॅकडाऊनसोबत जिल्हाबंदीची शक्यता पालकमंत्री सुनील केदार यांनी वर्तविली  आहे. शनिवारी त्यांनी येथे आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी जिल्हाप्रशासनाला  नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. १५ फेब्रुवारी पासून रूग्णसंख्या झपाट्यांने वाढत आहे. जिल्ह्यात २७ हाॅटस्पाॅट असून त्या ठिकाणी कन्टेनन्मेट झोन तयार करून त्या क्षेत्रात नियमाची काटेकाेर अंमलबजावणी करण्याच्या सुचना पालकमंत्र्यांनी दिल्या. तसेच ५० पेक्षा अधिक लोकांनी गर्दी केल्यास लग्न आयोजक व मंगल कार्यालय मालक या दोघांवर दंडात्मक कारवाई करण्यासोबत मंगल कार्यालय सील करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच जिल्ह्यात वर्धा शहर, आर्वी, हिंगणघाट, आष्टी, पुलगाव, देवळी या ठिकाणी हाॅकर्स व भाजी विक्रेते यांच्या कोविड चाचण्या करण्यात येत आहे.  दुकानदारानी यासाठी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. वर्धा शहरात गिताई नगर, स्नेहल नगर, सिंदी (मेघे), लक्ष्मी नगर, म्हसाळा, रामनगर, सावंगी (मेघे) हे ठिकाण  कोरोना हाॅटस्पाॅट आहेत अशी माहिती त्यांनी दिली. 

व्हेंटीलेटरची मागणी आताच कळवा 
जिल्ह्यात ९६१ ऑक्सीजन बेड आहेत.  १७९ आयसीयू बेड आहेत, ६८ व्हेंटीलेटर आहेत. पुढे आपल्याला व्हेंटीलेटरची गरज भासू शकते. त्यामुळे यासाठी आत्ताच मागणी कळवावी असे निर्देश पालकमंत्री केदार यांनी या बैठकीत दिलेत.  

लग्न सोहळे घरीच पार पाडण्याचे आवाहन 
सामाजिक कार्यक्रमात खास करून लग्न समारंभात ५० पेक्षा जास्त लोकांनी गर्दी केल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी लग्न घरच्या-घरीच करण्यावर भर द्यावा असे आवाहन  पालकमंत्र्यांनी केले.  

 

Web Title: Correa will also have a district along with a lockdown for control

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.