कोरोनामुळे गव्हाच्या मळणीला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 06:00 AM2020-03-26T06:00:00+5:302020-03-26T06:00:05+5:30

पूर्वी पोलिसांकडून परवानगी आणा त्यानंतरच गव्हाची मळणी करण्यासाठी यंत्र शेतात नेल्या जाईल, असे उत्तर सध्या हार्वेस्टर चालकांकडून दिल्या जात असल्याने गहू उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. तालुक्यातील बहूतांश शेतकऱ्यांनी गव्हाची कापणी केली आहे. शिवाय कापलेला गहू पीक शेतात ढिग करून ठेवला आहे. तर काही शेतकऱ्यांच्या शेतातील गहू पीक उभा आले.

Corona breaks wheat flour | कोरोनामुळे गव्हाच्या मळणीला ब्रेक

कोरोनामुळे गव्हाच्या मळणीला ब्रेक

Next
ठळक मुद्देहार्वेस्टर चालक म्हणतात पोलिसांची परवानगी आणा

लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू : शेतातील गव्हाची मळणी करण्यासाठी हार्वेस्टर सज्ज आहे; पण कोरोनाच्या भीतीमुळे तसेच सध्या जिल्ह्यात कलम १४४ लागू असल्याने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांच्या लॉक डाऊनची घोषणा केल्याने हार्वेस्टर चालकांकडून गव्हाची मळणी करायला नकार दिली जात आहे. पूर्वी पोलिसांकडून परवानगी आणा त्यानंतरच गव्हाची मळणी करण्यासाठी यंत्र शेतात नेल्या जाईल, असे उत्तर सध्या हार्वेस्टर चालकांकडून दिल्या जात असल्याने गहू उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.
तालुक्यातील बहूतांश शेतकऱ्यांनी गव्हाची कापणी केली आहे. शिवाय कापलेला गहू पीक शेतात ढिग करून ठेवला आहे. तर काही शेतकऱ्यांच्या शेतातील गहू पीक उभा आले. तो सध्या कापणी व मळणीच्या टप्प्यात आला आहे. झटपट मळणी करण्यासाठी हार्वेस्टर यंत्र हे शेतकºयांसाठी फायद्याचे ठरणारे आहे. परंतु, पोलिसांकडून होणाऱ्या कारवाईच्या धाकामुळे हार्वेस्टर चालकही शेतात यंत्र नेण्यास नकार देत आहेत. कोरोनाला अटकाव घालण्यासाठी शासन व प्रशासन स्तरावर सध्या प्रभावी उपाययोजना केल्या जात आहेत. शिवाय नागरिकांना घरातच थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर पूर्वी पोलिसांची परवानगी आता नंतरच हार्वेस्टर शेतात नेल्या जाईल असे हार्वेस्टर चालकांकडून शेतकºयांना हात जोडून सांगण्यात येत आहे.

गहू कापणीवर आला. गावात हार्वेस्टर आले आहे. मात्र, हार्वेस्टर चालक यंत्र पोलीसांची समंती मिळाल्याशिवाय शेतात नेण्यास तयार नाहीत. वेळीच गव्हाची मळणी न झाल्यास मोठा आर्थिक फटकाच या भागातील गहू उत्पादकांना सहन करावा लागणार आहे. इतकेच नव्हे तर वन्यप्राणीही उभ्या पिकाची नासाडी करतील.
- पंडीत म्हैसकर, शेतकरी, झडशी.

Web Title: Corona breaks wheat flour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.