चानकी, जयपूर, चारमंडळ गावांत कोरोना स्फोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 05:00 AM2021-04-15T05:00:00+5:302021-04-15T05:00:15+5:30

हमदापूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत चानकी गावात २३, जयपूर येथे ४३, तर चारमंडळ येथे ३१ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याची माहिती केंद्रातून मिळाली आहे. त्यामुळे कोरोनाचा विस्फोट आता ग्रामीण भागातही होत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. याची सुरुवात १२ एप्रिलपासून सुरू झालेली आहे. जयपूर येथील एक भाग कंटेनमेंट आणि बफर झोन तयार करण्यात आल्याने परिसर सील करण्यात आला आहे.

Corona blast in Chanki, Jaipur, Charmandal village | चानकी, जयपूर, चारमंडळ गावांत कोरोना स्फोट

चानकी, जयपूर, चारमंडळ गावांत कोरोना स्फोट

Next
ठळक मुद्देतब्बल ९७ व्यक्ती आढळल्या बाधित : नागरिकांची बेफिकिरी कारणीभूत

लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : शहरासह जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून प्रशासनाकडून युद्धस्तरावर उपाययोजना करण्यात येत आहे. मात्र, नागरिकांचा बेजबाबदारपणा आणि बेफिकिरी वाढत चालली असून हमदापूर प्राथमिक आराेग्य केंद्रातील चानकी, चारमंडळ, जयपूर गावांत कोरोनाचा विस्फोट होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. हमदापूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत चानकी गावात २३, जयपूर येथे ४३, तर चारमंडळ येथे ३१ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याची माहिती केंद्रातून मिळाली आहे. त्यामुळे कोरोनाचा विस्फोट आता ग्रामीण भागातही होत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. याची सुरुवात १२ एप्रिलपासून सुरू झालेली आहे. जयपूर येथील एक भाग कंटेनमेंट आणि बफर झोन तयार करण्यात आल्याने परिसर सील करण्यात आला आहे. तिन्ही गावांना सेलू येथील तहसीलदार महेंद्र सोनवणे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्नील बेले तसेच पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली आहे. कोरोना विषाणू वेगात पसरत असल्याने नागरिकांमध्ये कमालीची भीती वाढली असून ही धोक्याची घंटा आहे.

रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर औषधोपचार सुरू आहे. सर्व जण गृहविलगीकरणात आहे. चानकी येथील एक बाधित रुग्ण सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल आहे. तिन्ही गावांची पाहणी करून माहिती घेतली आहे. दोन गावांतील भाग सील करण्याचा निर्णय वरिष्ठ घेतील. नागरिकांनी सतर्क आणि सुरक्षित राहणे आवश्यक आहे.
 डॉ. प्रणाली वानखेडे, वैद्यकीय अधिकारी, प्रा. आरोग्य केंद्र, हमदापूर

चिकनीसह परिसरात कोरोनाने केली एन्ट्री
मागील पंधरा दिवसात चिकनीसह परिसरात झपाट्याने कोरोना रूग्ण आढळून आले आहे. जामनी, पढेगाव, निमगाव, दहेगाव, केळापूर, बोदड आदी गावात कोरोनाचा शिरकाव झाला असून रूग्ण आढळून आले होते. पण, आता या गावात कोरोना नियंत्रणात आला असून धोका अद्यापही टळलेला नाही.

 

Web Title: Corona blast in Chanki, Jaipur, Charmandal village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.