शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना ब्लास्ट ; एकाच दिवशी आढळले २०८ नवीन कोविड बाधीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 23:30 IST

कोरोना संकटाच्या काळातही गाफिल वर्धेकर नोव्हेंबर, डिसेंबर तसेच जानेवारी महिन्यात बेफिकर राहिल्याने कोरोनाने आपला प्रसार वाढविला. अशातच सध्या नवीन कोविड बाधित सापडण्याची गती वाढली आहे. इतकेच नव्हे तर नवीन कोविड बाधित वेळीच ट्रेस व्हावे या हेतूने तसेच परिस्थित नियंत्रणात रहावी यासाठी जिल्ह्यात कोविड चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत. मागील २४ तासांत जिल्ह्यात २ हजार ३२६ व्यक्तींची कोविड चाचणी करण्यात आली.

ठळक मुद्देकोरोनाने केला नवा विक्रम

 लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मागील दहा महिन्यातील उच्चांकी तोडत शुक्रवारी वर्धा जिल्ह्यात कोविड-१९ विषाणूने नवा विक्रम केला. मागील २४ तासांत जिल्ह्यात २ हजार ३२६ व्यक्तींची कोविड चाचणी केली असता तब्बल २०८ व्यक्तींचा अहवाल कोविड पॉझिटिव्ह आला आहे. शुक्रवार जिल्ह्यात २०८ नवीन कोविड बाधित सापडल्याने जिल्ह्याची कोविड बाधितांची संख्या आता १३ हजार १२० झाली आहे.कोरोना संकटाच्या काळातही गाफिल वर्धेकर नोव्हेंबर, डिसेंबर तसेच जानेवारी महिन्यात बेफिकर राहिल्याने कोरोनाने आपला प्रसार वाढविला. अशातच सध्या नवीन कोविड बाधित सापडण्याची गती वाढली आहे. इतकेच नव्हे तर नवीन कोविड बाधित वेळीच ट्रेस व्हावे या हेतूने तसेच परिस्थित नियंत्रणात रहावी यासाठी जिल्ह्यात कोविड चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत. मागील २४ तासांत जिल्ह्यात २ हजार ३२६ व्यक्तींची कोविड चाचणी करण्यात आली. त्यापैकी तब्बल २०८ व्यक्तींचा कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर १५ व्यक्तींच्या अहवालाची आरोग्य विभागाला प्रतीक्षा आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता नागरिकानी दक्ष राहण्याची गरज आहे.

जिल्ह्यात १ हजार ११७ ॲक्टिव्ह कोविड बाधितशुक्रवारी जिल्ह्यात २०८ नवीन कोविड बाधित सापडले असले तरी १९७ कोविड बाधितांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यात सध्या १ हजार ११७ ॲक्टिव्ह कोविड बाधित असून त्यांना चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी आरोग्य यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी प्रयत्न करीत आहेत.

दोघांचा घेतला बळीशुक्रवारी वर्धा जिल्ह्यातील दोन व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यात वर्धा तालुक्यातील ७८ वर्षीय पुरुष तर हिंगणघाट तालुक्यातील ५४ वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ३५५ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोविडमुक्तांची संख्या झाली ११ हजार ६४८शुक्रवारी तब्बल १९७ कोविड बाधितांनी कोविडवर विजय मिळविल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ११ हजार ६४८ व्यक्तींनी कोरोनावर विजय मिळविला आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या